ताज्या घडामोडी

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे विविध मागण्यांसाठी कोल्हापूर बोर्डास निवेदन

Spread the love

सांगली दि:१८(प्रतिनिधी)
कोल्हापूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर, विभाग कोल्हापूर यांना इयत्ता बारावी मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका
परीक्षकांना २०० व नियामकांना १२०० उत्तरपत्रिका तपासणी साठी देण्यात यावेत या संदर्भात आज निवेदन देण्यात आले या प्रसंगी विभागीय बोर्डाचे उच्च माध्यमिक विभाग शाखा प्रमुख श्री.अकुंश बाणासुरे सर यांनी स्विकारले.
मराठी विषयाचे काम पाहणारे लेखनिक श्रीमती विजया तिरवडे उपस्थित होत्या. सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ चे अध्यक्ष व सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सचिव प्रा.दिलीप जाधव
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा.बाबासाहेब माळवे ,
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.एच. व्ही.पुजारी
कोल्हापूर जिल्हा सचिव बी.डी.डवंग,कोल्हापूर जिल्हा खजिनदार.डॉ.सर्जेराव पाटील तसेच प्रा.एम.एम.कांबळे, प्रा.ए.आर.चौगुले हे उपस्थित होते . यावेळी उत्तरपत्रिका तपासणी कामी येणा-या अडचणी, उत्तरपत्रिका संख्या, उत्तरपत्रिका संकलन या विषयी चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!