ताज्या घडामोडी

सौ.चंदन तावडे-ढुमणे लिखित परिमळ भक्तीचा काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा

Spread the love

जेष्ठ साहित्यिक मा. चंद्रकांतदादा वानखेडे अध्यक्ष तर कविसंमेलनाध्यक्ष (शिवानुज) नितिन वायाळ

कोपरगाव – प्रतिनिधी
कोपरगाव येथील कवियत्री सौ चंदन तरवडे ढुमणे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद कोकमठाण तालुका कोपरगाव यांच्या परिमळ भक्तीचा काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या थाटात ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे . या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून कोपरगावचे गटविकास अधिकारी माननीय श्री .सचिन सुर्यवंशी ,गटशिक्षणाधिकारी माननीय श्रीमती .शबाना शेख मॅडम तसेच श्रीम .वनमाला पाटील श्री . ज्ञानेश्वर खराडे साहेब नाशिक . श्री . राजेंद्र ढेपले साहेब ( केंद्रप्रमुख ),श्रीम .विद्युलता आढाव मॅडम ( राष्ट्रीय .. अध्यक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी ) श्रीम .निर्मला जाधव मॅडम ( मुख्याध्यापिका कोकमठाण) हे उपस्थित राहणार असून प्रकाशन सोहळ्याबरोबरच निमंत्रितांचे कवी संमेलन असून कवी संमेलनाचे अध्यक्ष गुजरातचे सुप्रसिद्ध कवी माननीय नितीन वायाळ (शिवानुज) हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य दर्पणचे संपादक श्री.गुलाबराजा फुलमाळी ( सुप्रसिद्ध गीतकार कवी नेवासा )श्री . ज्ञानेश्वर शिंदे ( कवी / समिक्षक कोपरगाव )
सौ . अलका येवले ( ज्येष्ठ कवयित्री नाशिक ) या मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच राज्यातील अनेक निमंत्रित कवी कार्यक्रमाला येऊन आपली बहारदार रचना सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिमा काळे व सौ राजश्री मराठे वाणी या करणार आहेत. सौ. चंदन तरवडे यांच्या भक्तीरसाने भरलेल्या *परिमळ भक्तीचा* काव्यसंग्रहाला मा जेष्ठ साहित्यिक डॉ. नयनचंद्र सरस्वते यांची सखोल प्रस्तावना लाभली असून मा.चंद्रकांतदादा वानखेडे दादांची पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ आकाश तरवडे यांनी दिलेले आहे. काषाय प्रकाशन निर्मित या पुस्तकाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे .
सौ.चंदन तरवडे , ढुमणे यांनी थोड्याच कालावधीत साहित्यात भरारी घेतलेली दिसून येते . तरी आपण या सर्व सोहळयाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन कोपरगावचे कवी श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!