आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडी

मावळ तालुक्याला हादरुन टाकणारी घटना कोथुर्णे या ठिकाणी घडली होती..

मुला मुलींना शिक्षकांकडुन मार्गदर्शन करण्यात आले.काही संशयीत आढळल्यास त्याची तक्रार करण्याच्या सुचना देण्यात आल्या व स्वतःची काळजी आणि अनोळखी लोकांंपासुन दुर राहण्याचा सल्ला देण्यात आला.

Spread the love

आवाज न्यूज:  भाऊसाहेब हुलावळे, मावळ प्रतिनिधी ११ ऑगष्ट 

मावळ तालुक्याला हादरुन टाकणारी घटना कोथुर्णे या ठिकाणी घडली होती, त्या घटनेचा जाहिर निषेध करण्यासाठी पिंपळोली येथे जि.प.प्राथमिक शाळेच्या वतीने आणि शालेय व्यवस्थापन ,ग्राम पंचायतीच्या वतीने कोथुर्णे येथे चिमुकलीवर झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.

स्वराला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला फाशीच झाली पाहिजे या मागणीसाठी पिंपळोली याठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मुला मुलींना शिक्षकांकडुन मार्गदर्शन करण्यात आले.काही संशयीत आढळल्यास त्याची तक्रार करण्याच्या सुचना देण्यात आल्या व स्वतःची काळजी आणि अनोळखी लोकांंपासुन दुर राहण्याचा सल्ला देण्यात आला.

यावेळी पिंपळोली गावचे मा.सरपंच आणि शि.समितीचे अध्यक्ष .रामचंद्र आप्पा पिंपळे यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रा.पं.सदस्य आणि आरपीआयचे अध्यक्ष सिध्दार्थ चौरे आणि तंटामुक्त अध्यक्ष शिवसेनाउपविभाग प्रमुख संतोष बोंबले यांनी घडलेल्या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली यावेळी योगेश सोमवंशी सर व श्रीकांत दळवी सर यांनी मुलांना योग्य अशा सुचना दिल्या.

यावेळी ग्रा.पं.सदस्या.रेशमा गणेश गायकवाड,अंगणवाडी सेविका,मुक्ताबाई बोंबले,सुरेखा करवंदे,प्रिती लोखंडे ,घोडेकर मॕडम आणि शाळेतील मुलांचा सहभाग मोठा होता यावेळी हर घर तिरंगा यासाठी रॕली काढण्यात आली व तिरंग्याचे महत्व पटवुन दिले योग्य अशा सुचना देण्यात आल्या आहे या कार्यक्रमाचे आयोजन ग्रा.पं.सदस्य सिध्दार्थशेठ चौरे,योगेश सोमवंशी सर,आणि ग्रा.पं.सदस्या रेश्मा गायकवाड यांनी केले होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!