ताज्या घडामोडी
बिऊर दत्त सेवा सोसायटी वसुली शंभर टक्के – दिगंबर पाटील
शिराळा प्रतिनिधी
बिऊर ता शिराळा येथील दत्त सेवा सोसायटी वसुली शंभर टक्के पूर्ण झाली आहे.अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी बोलताना ते म्हणाले की संस्थापक दिनकर पाटील गुरूजी सचिव सुभाष पाटील , अमोल पाटील, तसेच सत्ताधारी व विरोधक यांच्या सहकार्याने शंभर टक्के वसुली झाली आहे. संस्थेचे भाग भांडवल १कोटी ५०लाख तर कर्ज वाटप १कोटी ८१लाख केले आहे.
आॅडीट वर्ग अ असून दहा टक्के लाभांश दिला आहे.