आरोग्य व शिक्षण

कलापिनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, रोटरी क्लब ऑफ मावळ आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

तळेगाव : कलापिनी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी तसेच रोटरी क्लब ऑफ मावळ आयोजित कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा 2022 तळेगाव शहरात उत्साहात संपन्न झाली

“शेती करतांना जसे बी पेरल्यांनंतर पीक येते,धान्य मिळते ती जणू काही सृष्टी ची कलाच आहे.आपणही आपला कोणताही व्यवसाय करताना किंवा नोकरी करताना आपली एक तरी कला जोपासली पाहिजे.त्यात खूप आनंद आहे.” असे विचार रोटरी क्लब तळेगाव सिटी चे अध्यक्ष रो.राजेश गाडे पाटील यांनी कलापिनी,रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि रोटरी क्लब ऑफ मावळच्या वतीने आयोजित कै.ना. वा.खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मांडले.

चित्रकला स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष आहे.एव्हढी वर्षे सातत्याने एखादा उपक्रम चालवणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे.पण कलापिनी संस्था उत्तम प्रकारे आयोजित करीत असते असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी प्रमाणेच ह्याही वर्षी मुलांकडून चित्रे काढून घेण्यात आली..आणि त्यातून निवडक ४५ चित्रे अंतिम फेरीत घेतली होती.

स्पर्धेच्या आधी २ तासाची कार्यशाळा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक श्री.विराज सवई आणि सौ.अमृता दामले यांनी चित्रकलेतील बारीक,बारीक गोष्टी कश्या लक्षात ठेवून चित्र काढायचे त्यामुळे तुमचे चित्र कसे उठावदार दिसेल या बद्दल माहिती दिली.अंतिम फेरीत मुलांनी खूपच सुंदर चित्रे काढली होती.
पारितोषिक वितरण रो.राजेश गाडे पाटील…रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी चे अध्यक्ष,
रो.मनोज ढमाले..प्रोजेक्ट चेअरमन, रो.रवींद्र घारे..पा.प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मावळ, रो. दत्तात्रय सावंत.. सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ मावळ, रो.दीपक चव्हाण.. व्हाइस प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मावळ,
रो.शाहीन शेख.. सेक्रेटरी..रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे ,खजिनदार श्री. श्रीशैल् गद्रे उपस्थित होते.

कलापिनी चे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक करताना रोटरी क्लबचे आणि कलापिनी संस्थेचे संबंध असेच अतूट राहतील असे सांगितले आणि स्पर्धेत भाग घ्यावा यासाठी पालक मुलांना आवड जोपासून पाठवतात ह्याचे कौतुक केले.रोटरी क्लबच्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्पर्धे बद्दल समाधान व्यक्त केले.

बक्षीस  समारंभ चे सूत्र संचालन सौ.संध्या गाडे हिने केले. कलापिनीचे सचिव हेमंत झेंडे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीपाद बुरसे,अनघा बुरसे,रवींद्र पांढरे, ज्योती ढमाले, आरती पोलावार,शार्दुल गद्रे,संदीप मनवर,रामचंद्र रानडे यांनी परिश्रम घेतले .

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

गट..५ वी ते ७ वी

प्रथम क्रमांक..सायली नरोटे
कांतीलाल शहा विद्यालय
द्वितीय क्रमांक.. श्रेया भोगील..माऊंट सेंट शाळा
तृतीय क्रमांक..शांभवी जाधव..मामासाहेब खांडगे शाळा.
उत्तेजनार्थ..

१).स्वरा लखपती
एल्परो इंटरनॅशनल स्कूल
२)राशी नवले.. पो द्दार इंटरनॅशनल स्कूल
३)धनश्री बेलोकर..सरस्वती विद्या मंदिर
४)सिध्दी क्षीरसागर..आदर्श विद्या मंदिर.

गट..८ वी ते १० वी

प्रथम क्रमांक…सृष्टी जाधव
हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय क्रमांक..रौनक यादव…कृष्णराव भेगडे शाळा
तृतीय क्रमांक..श्रावणी हेंड्रे
कांतीलाल शहा विद्यालय
उत्तेजनार्थ..

१)आर्या झोपे..
अक्षरा इंटरनॅशनल स्कूल
२)आदित्य जंगम..श्री जोतिबा विद्यालय
३)ईश्वरी दिघे…

सर्व फोटोज साठी लिंक
कै.ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा २०२२
https://photos.app.goo.gl/znCKMgQkjXBEuPzS9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!