ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ७ (प्रतिनिधी)

जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यामार्फत गुरुवार (ता. ७) रोजी आयोजित व्याख्यानात वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अशोक बावगे यांनी ‘ आरोग्य संवर्धन आणि युवक ‘ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या धावपळीच्या जीवनात युवकांना होणारे आजार, संवर्धन व उपयायोजना या विषयावर संवाद व चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रविंद्र आळंगे, प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. राजू शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. भिलसिंग जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाळ कुलकर्णी तर आभार डॉ. किरण राजपूत यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!