ताज्या घडामोडी

पतसंस्थामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक चालना : सत्यजितराव देशमुख

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर

पतसंस्थामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक चालना आहे.असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितराव देशमुख यांनी केले.ते मांगले ता शिराळा येथे शिवतेज ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, रणजीतसिंह नाईक, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना देशमुख पुढे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या गरजेच्या वेळी पतसंस्थांचे मोलाची आर्थिक सहकार्य लाभत आहे. पतसंस्थांमुळे कुटुंबांना बचतीची सवय लागत आहे. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांचे मार्गदर्शन लाभलेली ही शिवतेज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निश्चितच आदर्शवत काम करेल. या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंततराव पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक राजन पाटील
माजी सभापती मायावती कांबळे , सरपंच मीना बेंद्रे , उपसरपंच धनाजी नरुटे, मोरणा उद्योग समूहाचे सत्यम पाटील, संपतराव चरापले,राहुल पवार, माजी सरपंच मोहन पाटील, ग्रा.प.सदस्य बजरंग चरापले , निनाईचे संचालक उत्तम गावडे,शिवतेज पतसंस्थेचे संस्थापक अनिलराव देशमुख, चेअरमन तुकाराम घोडे,व्हा.चेअरमन राहुल भोई, व्यवस्थापक विशाल माळी,अधिक चरापले आदींसह पतसंस्थेचे संचालक,सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी स्वागत चेअरमन तुकाराम घोडे यांनी केले.तर आभार अंकुश पाटील यांनी मानले. शिवतेज पतसंस्थेच्या मांगले शाखेचे उद्घाटन करताना प्रल्हाद पाटील, सत्यजित देशमुख,
शेजारी रणजीतसिंह नाईक, विजय पाटील, अनिलराव देशमुख व अण्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!