ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा भावसार क्षत्रिय समाजा तर्फे शिक्षक वृंदाचा भव्य सत्कार

Spread the love

प्रतिनीधी- डॉ.सुनील ना.भावसार

भारतीय संस्कृती मध्ये आई नंतरचे सर्वात महत्वाचे स्थान आहे गुरूचे, आई प्रमाणेच गुरू म्हणजे शिक्षक मुलांना सतत घडविण्याचे सुसंस्कारित करण्याचे व सक्षम बनविण्याचे काम करीत असतात.म्हणूनच सर्वं शिक्षक वृंदाचे स्थान विद्यार्थ्याच्या जडण-घडणी मध्ये मोलाचे आहे. शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेल्या, भरीव कार्याची तसेच विद्यार्थी व समाजाला दिशा देण्याची जबाबदारी सक्षमतेने सांभाळणाऱ्या भावसार समाज बंधू भगिनींची त्यांच्या कार्याची दखल घेऊन संपूर्ण परभणी जिल्ह्यातील 90 शिक्षकांचा सत्कार माननीय कार्यसम्राट आमदार डॉ.श्री.राहुल पाटील साहेब,विधानसभा मतदार संघ परभणी यांच्या हस्ते श्री हिंगलाज माता मंदिर , दत्तधामच्या मागील बाजूस,वसमत रोड,कुलस्वामीनी, भावसार नगर, परभणी येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी परभणी भावसार समाजाचे अध्यक्ष श्री राजेश बाबुराव पेंडकर, परभणी जिल्हा भावसार समाज परभणीचे अध्यक्ष वसंतराव लांडे भावसार समाजाच्या महिला अध्यक्ष निर्मलाताई भावसार महाराष्ट्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक रत्नपारखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स.भु. श्रीराम गरजे यांनी केले तर मनोगत विवेक केदारे,वैशाली भावसार,गंगाधर कंकाळ, श्री किशन रत्नपारखी, सारिका पेंडकर,सचिन हजारे,प्रतिमा मसारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमेन्द्र भावसार यांनी केले तर वंदना नांदोडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर बेदरकर, नरेंद्र भावसार, प्रसन्न भावसार,उमेश ढगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वी पार पडला. स.भू. श्रीराम गर्जे श्री हिंगलाजमाता मंदिर संस्थान परभणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!