आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांची आरोग्य तपासणी ; प्रथमच मिळाल्या मूलभूत सुविधा

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांकरिता प्रथमच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आज बुधवार दिनांक 16 मार्च रोजी अशोक इंटरप्राईजेस स्वच्छता मक्तेदार यांच्यातर्फे आयोजित या शिबिराचा शुभारंभ मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते स्वच्छता मक्तेदार पद्माकर आगिवले यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तळेगाव-दाभाडे अग्निशमन केंद्र येथे झाला.

या शिबिरात 220 कंत्राटी कर्मचाऱ्यांची मधुमेह, थायरॉईड, अस्तमा, तसेच नेत्र व त्वचा रोग तपासणी साक्षी डायग्नोस्टिक च्या माध्यमातून केल्या जात आहेत . या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन त्यांच्यासाठी मेडिक्लेम आणि ईपीएफ सुविधाही कर्मचाऱ्यांना मिळाव्यात यासाठी नगरपालिका आग्रही असून त्यांच्या हिताचे निर्णय नगरपालिकांनी कॉन्ट्रॅक्टरने घ्यावेत असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी यावेळी दिली.

तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मक्तेदार म्हणून माझी असल्याने तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया अशोक इंटरप्राईजेस चे मक्तेदार पद्माकर जागविले यांनी दिली.प्रथमच मिळत असलेल्या सुविधांमुळे कंत्राटी कामगारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!