ताज्या घडामोडी

प्रहार जनशक्ती पक्षाची देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर महिला कार्यकारिणी जाहीर.

Spread the love

देवळाली प्रवरा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कदम, तर राहुरी फॅक्टरी शहर महिला आघाडी अध्यक्ष पदी कांबळे यांची निवड..जागतिक महिला दिनाच्या प्रहार चे वतीने निमित्ताने महिलांचा सन्मान..

देवळाली प्रवरा – दि. ८ मार्च

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा शहरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर सभामंडपामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी सौ भाग्यश्री सुनील कदम तर राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्षपदी सौ रजनी प्रभाकर कांबळे यांची जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निवड करणेत आली व जिल्हाध्य अभिजीतदादा पोटे यांचे हस्ते हस्ते देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी कार्यकारिनी जाहीर जाहीर करून या महिला पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवळाली प्रवरा शहर महिला आघाडीची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शहर महिला अध्यक्ष पदी भाग्यश्री सुनील कदम, तर उपाध्यक्ष म्हणून सुरेख विस्वास शिंदे व आशा माळी यांची निवड करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन अध्यक्ष पोटे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरी शहर महिला आघाडीची आज या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये राहुरी फॅक्टरी शहर महिला आघाडी अध्यक्षपदी रजनी प्रभाकर कांबळे, उपाध्यक्षपदी वंदना संजय कांबळे, अफसाना सलीम सय्यद तर सचिव पदी लैला असलम शेख यांनी निवड करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रहार चे जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, जिल्हा संघटक सरपंच बाळासाहेब खर्जुले, प्रहार सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजय वाघ, प्रहार नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार दिव्यांग क्रांती राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहार दिव्यांग क्रांती देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख, विजय कुमावत, अबिद शेख आदींसह शेकडो ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!