महाराष्ट्र

रोटरी सिटीच्या पिंकेथोनला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने आयोजित केलेल्या व तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटर क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने सहयोग केलेल्या रोटरी सिटी पिंकीथॉनला तळेगाव दाभाडे शहर व पंचक्रोशीतील महिलांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. 1000 महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता.यावर्षी या पिंकीथॉनचे दुसरे वर्ष असून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डिस्टिक गव्हर्नर रोटरियन मंजू फडके यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून या पिंकी त्यांची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी DRR रो सिद्धेश गायकवाड रोटरी सिटी चे अध्यक्ष रो सुरेश शेंडे ,उपाध्यक्ष रो किरण ओसवाल ,सचिव रो भगवान शिंदे, रोटरेक्टचे अध्यक्ष हर्षद जव्हेरी,रो दीपक फल्ले,रो दिलीप पारेख,रो विलास काळोखे,रो संजय मेहता,रो प्रदीप मुंगसे,रो राकेश गरुड,रो संतोष परदेशी हे उपस्थित होते.

DG रो मंजू फडके यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी ने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून रोटरी सिटीने महिलांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले.

तळेगांव दाभाडेची कन्या कु.गार्गी ईश्वर देशमाने या राज्यस्तरीय मल्लखांबपटू हिने दाखवलेले अविस्मरणीय असे मल्लखांबाचे प्रात्यक्षिक हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.

तसेच मावळ केसरी पैलवान सनम समीर शेख व कुस्तीपटू ईश्वरी मोहन झिजुरके यांचा सन्मान रोटरी सिटीच्या वतीने करण्यात DG मंजू फडके यांच्या हस्ते करण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी यांनी माझी वसुंधराची शपथ सर्व महिलांना दिली व तळेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंती केली.

“सशक्त नारी, सशक्त भारत” या घोषवाक्यावर वेगवेगळे स्लोगन करून घेऊन आलेल्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक सुनीता जोशी,द्वितीय क्रमांक रूपाली दाभाडे व तृतीय क्रमांक रिद्धी पोतदार यांनी पटकावला.

याच उपक्रमामध्ये ठेवलेल्या लकी ड्रॉ मध्ये मानाच्या दोन संकेत पैठणी प्रथम क्रमांक दिव्या पाटील यांना तर द्वितीय क्रमांक सोनाली प्रधान यांना मिळाला.

तसेच पल्लवी भाटिया व अनुजा भालेराव यांना चांदीचा छल्ला व चांदीची करंडा मिळाला तर एक्वा पुरिफायर कावेरी पाटील यांना मिळाला. अनुशा मुरल ,अंकिता वाजे, अलका आर्या, सृष्टी मानकर, शगुन कुल, नंदिनी साबळे, काजल मडगे, संध्या वाळुंज, सृष्टी कुंभार यांना सुद्धा लकी ड्रॉ मध्ये बक्षिसे लागली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर धनश्री काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण ओसवाल यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन शरयू देवळे, स्वाती मुठे, सुनंदा वाघमारे, कमल ढमढेरे, वर्षा खारगे, निखिल महापात्रा,प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे, वैभव तनपुरे, रितेश फाकटकर व सर्व रोटरी मेंबर्सनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!