महाराष्ट्र

गावठाण येथे श्री भैरवनाथ देवाचे ऊत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणआणि ,बैलगाडा शर्यती ..

Spread the love

लोणावळा ता.२९(प्रतिनिधी ) गावठाण येथे श्री भैरवनाथ देवाच्या ऊत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण ,बैलगाडा शर्यतीचे तसेच देवाच्या भराडाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ता.२६ रोजी ते ता.१ एप्रिल असे रोज सकाळी ८ते दुपारी १ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गाथेचे संगीत पारायणाचे व्यासपीठचालक गुरूवर्य ह.भ.प. गणेश महाराज कार्ले (पुणे) यांचे नेतृत्वाखाली होत आसून सुमारे वीस पंचवीस भाविकांकडून सामुहीक संगीत गाथा पारायण होत आहे. मृदूंगमणी ह.भ.प.निवृत्ती मराठे , गायनाचार्य सुभाषमहाराज पडवळ , कीर्तनकार हभ.प.लक्ष्मण महाराज विकारी , तसेच ह.भ.प. खंडूबुवा कंधारे , ह.भ.प.काळुराम देशमुख , संयोजक ह.भ.प.विलासभाऊ बडेकर , तसेच संयोजक श्री.पांगारे पाटील ,आदी अनेक मान्यवर या पारायणास बसले आहेत.

ता.२७ रोजी ह.भ.प. दिलीपमहाराज खेंगरे , भाजे यांचे कीर्तन झाले.

ता.२८ रोजी ह.भ.प. नितीनमहाराज काकडे (पुणे ) यांचे कीर्तन झाले.

ता.२९ रोजी ह.भ.प. शाळीक महाराज खंदारे यांचे कीर्तन झाले.

ता.३० रोजी ह.भ.प.तुषार महाराज दळवी (भाजे )यांचे कीर्तन होईल.

ता.३१ रोजी ह.भ.प.दत्ता महाराज दोहे यांचे कीर्तन होईल.ता.१ रोजी ह.भ.प.बाबाजी महाराज काटकर यांचे कीर्तन होईल , तर ता.२ रोजी ह.भ.प.वैराग्यमुर्ती गणेशामहाराज कार्ले (पुणे ) यांचे सकाळी दहा ते बारा काल्याचे कीर्तन होईल.

ता. नंतर महाप्रसाद होईल. राञी महाआरती होऊन श्री भैरवनाथांची पालखी छबिण्यातून मिरवणूक होईल.

ता.३रोजी श्री.भैरवनाथांचा भराडाचा कार्यक्रम होईल.शिवमल्हार , जागरण गोंधळ पार्टी सादरकर्ते आहेत.ता.५रोजी टाटा तलावामधे भव्य बैलगाडा छकडी शर्यती होतील.प्रथम क्रमांकाला ३१हजार रोख कै.प्रविण रामचंद्र गवळी यांचे स्मरणार्थ युवा कार्यकर्ते सुमित प्रकाश गवळी यांचेकडून देण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकाला सामाजिक कार्यकर्ते कै.सोनु अनाजी वाळंज यांचे स्मरणार्थ उद्योजक बाबुजी वाळंज यांचेकडून २५ हजार देण्यात आले आहेत.तिसऱ्या क्रमांकाला कै.नानकराम नाथुलाल शर्मा यांचे स्मरणार्थ राजेंद्र एन.शर्मा यांनी २० हजार रूपये दिले आहेत. चवथ्या क्रमांकाला १५ हजार कै.शंभो बबन हारपुडे यांचे स्मरणार्थ सुरज शांभो हारपुडे यांचेतर्फे देण्यात आले आहेत. तर पाचव्या क्रमांकाला १० हजार बक्षिस माजी नगरसेवक निखिल डी.कविश्वर यांचेतर्फे ठेवण्यात आले आहे.

असे श्री.भैरवनाथ देवस्थान उत्सव कमिटीचेवतीने अध्यक्ष सुनिल कान्हु हारपुडे , उपाध्यक्ष नारायण खंडू वाळंज , सेक्रेटरी बाळकृष्ण हरिभाऊ चिकणे , खजिनदार गोपाळ मारूती हारपुडे , उपखजिनदार सुनिल काशिनाथ दहीभाते , सहसेक्रेटरी राजू विष्णू शिंदे यांनी सांगितले.

श्री .भैरवनाथ देवस्थान विश्वस्थ विठ्ठल रघुनाथ निकुडे , प्रकाश आप्पा गवळी , गणपत मनाजी हारपुडे , संतोषी रामचंद्र शिंदे , राजू बाबुराव दळवी , भगवान पांडुरंग पांगारे , संजय भिकू तिकोणे , गोपाळ मारूती हारपुडे आदी पदाधिकारी आहेत.

आखंड हरिनाम सप्ताह सौजन्य राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास भिकू बडेकर , .सा.कार्यकर्त्या सौ.शालीनी आमित गवळी , सौ.आमृता आमोल ओंबळे यांचे आहे….समाप्त…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!