आपला जिल्हा

जागतिक ऑटिज्म जागरूकता दिवस साजरा

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत

 

मोशी प्राधिकरण दिनांक 2 एप्रिल या दिवशी जागतिक ऑक्टिजम दिन साजरा केला जातो या दिवशी ऑटिज्म या विकाराबाबत अधिक माहिती दिली जाते जेणेकरून समाजामध्ये ऑटिज्मने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी समाजातील व्यक्ती योगदान देऊ शकतात. ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो मुलांच्या मेंदूतील बदलामुळे उद्भवते.

ऑटिज्मबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी आणि यामध्ये पीडित लोकांना सशक्त करणे आणि समर्थ करण्यसाठी वर्ल्ड ऑटिज्म अवेअरनेस डे साजरा करण्यात येतो. या दिवशी सदर आजाराबाबत माहीत असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या डिसऑर्डरच्या बाबत जागरूकता दर्शवतच आपण पीडीत मुलांच्याबाबत संवेदनशील राहू शकतो आणि त्यांचे जीवन अधिक सोपे करू शकतो. जाणून घेऊया काय आहे ऑटिज्म आणि त्याची लक्षणे

क्लिवलँड क्लिनिकनुसार, ऑटिज्म एक न्यूरोलॉजिक डिसऑर्डर आहे, जो मुलांच्या मेंदूत होणाऱ्या बदलामुळे उद्भवतो. याला ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. हा आजार असणाऱ्या मुलांचे वागणे, बोलणे आणि शिकण्याची पद्धत ही इतर मुलांच्या तुलनेत वेगळी असते.

ऑटिज्मने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना बोलण्यात त्रास होतो. तसंच त्यांना समोरच्या व्यक्तीचे हावभाव समजण्यासह त्रास होतो. समोरची व्यक्ती काय बोलत आहे अथवा काय सांगत आहे हे त्यांच्या मेंदूपर्यंत पटकन पोहचत नाही. याशिवाय भाषेसंबंधित कौशल्य खूप उशीरा त्यांना अवगत होते. व्यक्तींसह नाते बनविणे कठीण होते. तसंच एकच हावभाव सतत करणे, कोणताही बदल न स्वीकारणे आणि इतर अनेक कामांना समजून घेण्यास या व्यक्तींना वेळ लागतो.

 

 

ऑटिज्म आजार नक्की का होतो याबाबत अजूनही तितकीशी ठोस माहिती नाही. मात्र अनुवंशिकता आणि गरोदर असताना जर अति ताण असेल तर बाळाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन ऑटिज्म आजार होण्याची शक्यता असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्वरीत या आजाराबाबत कळत नाही

बसता बसता सतत शरीर हलवत राहणे, हात हलवणे, एकच शब्द सतत बोलणे, एकच हावभाव करणे

 

सेन्स ऑर्गन्स अधिक संवेदनशील असणे

 

जोरदार आवाजाने त्रस्त होत चिडणे

 

लोकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात न पाहता बोलणे

 

कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करणे

 

शारीरिक स्पर्श नको असणे

 

रोबोटिक अथवा एकसुरात बोलणे

 

काही माणसांशीच संवाद साधणे

 

लोकांचे बोलणे न समजणे अथवा त्यांचे इशारे न समजणे

एव्हढ्या प्रक्रिया असताना सामान्य जीव आज आपल्या समाजाच्या सहवासात वावरत असताना आपण ओळखू शकत नाही ही शोकांतिका.

अश्या ग्रस्त मुलांना आपण जतन करून जपले पाहिजे या ध्येयाला अनुसरून पिंपरी चिंचवड शहरातील प्रोग्रेस ऑटिसम स्कूल यांनी २ एप्रिल या दिवशी शहरभर जनजागृती

करत समाजामध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आज केला आहे.या शाळेच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य साकारून शहरात पहिल्यांदाच हा दिवस साजरा होताना नागरिकांनी पाहिला आहे.मोशी प्राधिकरण, स्पाईन रोड परिसरात प्रोग्रेस ऑटीजम एज्युकेशन सोसायटी संस्था असून ऑटीजम ग्रस्त मुलांना समाजापासून दूर न ठेवता पालकांनी त्यांच्यावर योग्य उपचार व शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, समाजाच्या भीतीपोटी किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी मुलाच्या आयुष्याशी खेळू नये, हा सर्वसामान्य आजार असून यातून मुले बाहेर पडू शकतात, पालकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असे प्रोग्रेस ऑटीजम एज्युकेशन सोसायटी संस्था यांनी व्हिक्टरी कट्टा शी बोलताना सांगितले ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!