आपला जिल्हामहाराष्ट्र

किल्ले शिवनेरीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आमनेसामने

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील हे आज समोरासमोर आले.

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या काही जागा जाहीर झाल्यामुळं आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघही यास अपवाद नाही. मात्र, आज या मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवार शिवनेरीवर एकत्र आले, तेव्हा एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. सध्या या भेटीची राज्यभरात चर्चा आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत. तर, अजित पवारांच्या गटातून शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतरही आढळराव पाटील मतदारसंघात सक्रिय राहिले. आता पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत.

अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात संपर्कच नसल्याचा त्यांचा आरोप आहे. अमोल कोल्हे देखील त्यांना आपल्या परीनं उत्तर देत आहेत. अजित पवारांनी कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीच त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात असलेल्या आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळं इथली लढत चुरशीची झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!