आपला जिल्हामहाराष्ट्रमावळ

पवना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एव्हढा पाणीसाठा

पाऊस लांबल्यास पाणीकपात करावी लागणार

Spread the love

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एव्हढा पाणीसाठा आहे. जर मान्सूनचे आगमन लांबले तर पाणीकपात करावी लागेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

 

ते म्हणाले, अतिउष्णतेमुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरेसा असेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

 

 

नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाणी शिळे होत नसल्याने उरलेले पाणी फेकून देऊ नये. त्या पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने स्वच्छ करण्यासाठी, बागकाम आणि पाणी देण्यासाठी, घरे किंवा इमारती आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी करू नये. तसेच सर्व सोसायटी मालकांनी सांडपाणी प्लांट व बोअरवेल चांगल्या स्थितीत ठेवावे व त्याचे पाणी फ्लॅटमधील फ्लॅट्समधील उद्यान परिसर स्वच्छ करण्यासाठी वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!