ताज्या घडामोडी

इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रॅली

Spread the love

इस्लामपूर दि.८ प्रतिनिधी
इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रॅली काढून नारी शक्तीचे दर्शन घडविले. पूर्वी घराचे अंगण लोटण्यापलीकडे महिला घराचा उंबरा ओलांडत नव्हत्या. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी उत्तुंग कामगिरी करीत आहेत. तुमचे एक धाडसी पाऊल तुम्हाला यशाच्या महामार्गावर घेवून जाईल, असा विश्वास शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी व्यक्त केला.
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही मोटार सायकल मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली. जयंत नेत्रालय,शिवाजी चौक,आष्टा नाका,झरी नाका,आझाद चौक,लाल चौक,गांधी चौक, यल्लाम्मा चौकातून राष्ट्रवादी कार्यालया समोर रॅली विसर्जित करण्यात आली. फेटे गुंडलेल्या महिला भगिनींनी शहराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहात महिला भगिनींनी एकमेकीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रोझा किणीकर म्हणाल्या,आपल्या देशातील माता जिजाऊ पासून सावित्रीबाई फुलेंच्यापर्यंत आणि इंदिरा गांधीच्यापासून कल्पना चावलापर्यंत कर्तृत्ववान महिलांची मोठी परंपरा आहे. आपणास त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे लागेल. महिला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आपली धावण्यात वेगावर मर्यादा ठेवल्या,तर आपल्या ध्येयापासून आपणास कोणी रोखू शकत नाही.
यावेळी माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,उषा पंडीत-मोरे,पुष्पलता खरात,शैलजा जाधव,अलका शहा,माजी नगरसेविका सुनीता सपकाळ,संगिता कांबळे,सुनंदा साठे,सुवर्णा जगताप,प्रतिभा पाटील, मनिषा पेठकर, योगिता जाधव, मंदाकिनी चव्हाण,डॉ.सुवर्णा माळी,डॉ.स्वाती कुंडले,जायंटस ग्रुपच्या संगीता शहा,कविता शहा,प्रतिभा शहा,श्रद्धा कुलकर्णी,मधु फौंडेशनच्या मंगल देसावळे,युवती शहराध्य क्षा प्रियांका साळुंखे, ब्रह्मकुमारीच्या भगिनी, तसेच महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
प्रारंभी उषा पंडीत-मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करीत महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी डॉ.सुवर्णा माळी, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. अलका शहा यांनी आभार मानले- इस्लामपूर येथे महिला दिनानिमित्त इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित मोटार सायकल रॅलीत सहभागी शहराध्यक्षा रोझा किणीकर व महिला कार्यकर्त्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!