ताज्या घडामोडी

नवा भारतीय शिव वाहतूक संघटनेत अब्दुल्ला खान यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश

Spread the love

मुंबई – माहीम परिसरातील प्रसिद्ध उद्योगपती अब्दुल्ला खान यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे नेते, नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश अगरवाल, सह सरचिटणीस प्रवीण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली नव भारतीय शिव वाहतूक संघटनेत प्रवेश केला.

यावेळी अब्दुल्ला खान यांची नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी अब्दुल्ला खान यांना नियुक्ती पत्र देऊन पक्ष व संघटना वाढवून लोकांची कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य सहसचिव जयप्रकाश अगरवाल याप्रसंगी मार्गदर्शनस्पर बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाकचा कायदा आणला, ३७० कलम हटविले, कोरोना काळात केवळ भारतीयांकरिता नव्हे संपूर्ण जगाला लसीचा पुरवठा करून महामारी पासून संरक्षण केले. यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!