महाराष्ट्र

औढे खुर्द , औढोली ग्रूपग्रामपंचायतचेवतीने ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न ; आर एम सी च्या ञासाबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर..

औंढे , औंढोली ग्रूपग्रामपंचायतचेवतीने आज ग्रामसभा जिल्हापरिषद शाळेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी , व सदय्य

Spread the love

आवाज न्यूज:मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी 17 ऑगष्ट

औढे खुर्द , औढोली ग्रूपग्रामपंचायतचेवतीने ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न ; आर एम सी च्या ञासाबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर
आवाज न्यूज:मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी 17 ऑगष्ट. औढे खुर्द , औढोली ग्रूपग्रामपंचायतचेवतीने ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. येथील औंढे हद्दीतील लोहर आर एम सी चे पावसाळ्यातील दूषित पाणी व वाहनांच्या रस्त्यावर रांगाचरांगा यामुळे नागरिकांकडून तक्रारी असल्याने त्याबाबत हटविण्याचा ठराव करण्यात आला असून तहसिलदार , जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव संमत झाला.

सभेमधे अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच अरूण बबन चव्हाण यांनी गावातील कचरामुक्तीसाठी गाडी आहे , पण तो टाकण्याची जागा नाही. नगरपरिषद टाकण्यासाठी परवानगी देत नाही. म्हणून गाडी फिरवत नाही , त्यांना फक्त प्लॕस्टीक पाहिजे आसते. आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी १७ हजाराची आर्थिक तरतूद केली असून जागा उपलब्ध  नसल्यामुळे प्रकल्प मार्गी लागत नाही,ग्रामविकास अधिकारी .जोशी म्हणाले.
औंढोली गावात पांधण- रस्त्याबाबत त्या मोकळ्या न केल्याने त्याचा ञास वाहतुकिस , अडथळे निर्माण होतात. म्हैस , बैल , अवजारे , औत ने आण यासाठी पांधण रस्ते करणे गरजेचे असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता , ग्रामविकास अधिकारी आर एस.जोशी म्हणाले , गावात अतिक्रमणे चालू असताना कुणी बोलत नाही , अर्ज देत नाही , नंतर काही लोक जागे होतात. त्या त्या त्यावेळी लक्ष टाकायला पाहिजे. संबंधित अतिक्रमणे करणाऱ्या व्यक्तीला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोखले पाहिजे..

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश मांडेकर , ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई जांभूळकर , सदस्या रत्नाताई संदिप खाडे ,रोशनाताई नवनाथ पाठारे , आदीसह अंगणवाडी कार्यकर्त्या अनिता केदारी  कविता मांडेकर , अंगणवाडी मदतनीस,सुजाता मानकर , आरोग्य विभागाचे कर्मचारी  राजेंद्र घोडके ,. आशाताई, छाया शेवाळे , तसेच औंढे विकास सोसायटी चे व्हाईस चेअरमन सुरेश आंबेकर , उद्योजक नारायण आंबेकर , औंढोली चे पोलिस पाटील गुरूनाथ मांडेकर , लिपिक सोमनाथ आहेरे ,कर्मचारी कार्तिक जगताप , मोरेश्वर मांडेकर , युवक कार्यकर्ते मच्छिंद्रनाथ मांडेकर , तसेच लिपिक गणेश शिळावणे , आदी अनेक मान्यवर या ग्रामसभेत उपस्थित होते..

वैतागवाडी ((औंढे वाडी ) या मिनीआंगणवाडीला मोठी अंगणवाडी म्हणून मंजूरी मिळाली असून साडेसात लाख निधी ईमारत बांधण्यासाठी आलेला आहे , असे यावेळी ग्रामविकास अधिकारी .जोशी म्हणाले. अंगणवाडीला ग्रामपंचायतीचे वतीने जागा उपलब्ध करावी व इमारत बांधण्याची व्यवस्था करावी , अशी अंगणवाडी कार्यकर्त्या .कविता मांडेकर यांनी विनंती केली.

कोविड काळात घरोघरी जावून आम्ही मास्क वाटले , सॕनिटायझर वाटले , तसेच लोकांची तपासणी केली.आॕक्सिजन पातळी तपासली , याबद्दल आम्हाला ग्रामपंचायतीचे मार्फत महिना हजार रूपयेप्रमाणे तेरा हजार येणे आहे , अशा दोन आशाताई व अंगणवाडी कार्यकर्त्या अशा सहाजणींचे पेमेंट केले नसल्यामुळे आम्ही ते पैसे कधी देणार , असा प्रश्न आशाताई छाया शेवाळे , अनिता केदारी , कविता मांडेकर यांनी उपस्थित केला.यावर सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी यांनी ते पेमेट देण्यात येईल , असे अश्वासन दिले.

दत्ताञेय रसाळ यांनी गावात गणपतीचे आधी सर्व खांबावर विजेचे एलईडी दिवे , ट्यूब बसवावेत , अशी मागणी केली.
विलास जांभूळकर यांचेतर्फे गावात लोणावळा नगरपरिषद आणि इतर ग्रामपंचायतीचे प्रमाणे ओला व सुका कचरा असे कचराकुंडी बास्केट बसवावेत , अशी मागणी केली.
गावात शिरताना पाण्याचे डबके साचते , तसेच द्दुतगतीमार्गाखाली पाणी साचते , तसेच लोहर आर एम सी चा , वाहनांच्या रस्त्यावर रांगा , उन्हाळ्यात धुरळा तसेच पावसाळ्यात पाणी साचते , त्याबाबत जिल्हाधिकारी यांना व वडगाव ये बांधकाम खात्याकडे प्रस्ताव पाठवणार असे सरपंच , उपसरपंच , सदस्य  नाणेकर व . मांडेकर म्हणाले.
तसेच पुलाखाली साचलेले पाणी , तात्काळ काढण्याची कार्यवाही केली आहे. ञास याबाबत बंदोबस्त करावा
अशी मागणी करण्यात आल्यानंतर तेथे जेसीबी लावून पाणी काम केले.

औंढे गावातील रस्त्याची कामे होत असताना , गतीरोधक मोठे बनवल्याने वाहनचालकांना ञास होतो , असे उद्योजक नारायण आंबेकर म्हणाले यावर बोलताना सरपंच अरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम आणि सदय्य , माजी उपसरपंच निलेश नाणेकर , तसेच ग्रामविकास अधिकारी म्हणाले , लहान मुले खेळतात , अपघात झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही , यावर काही प्रमाणात गतीरोधक कमी करण्याचे ठरले. ग्रामपंचायतीचे हद्दीतील औंढोली व औंढे येथील स्मशानभूमिचे जागेबाबत न्यायालयात केस चालू असल्याने तेथे केसला जबाबदार व्यक्तीने हजर राहिल्यास प्रश्न निकाली निघेल,असे ग्रामपंचायत सदय्य संदेश मांडेकर , तसेच सरपंच .चव्हाण सदस्य निलेश नाणेकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!