ताज्या घडामोडी

आनंदी जीवनासाठी नेहमी सकारात्मक विचार करावा : सोपान शेडगे

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
आनंदी जीवनासाठी नेहमी सकारात्मक विचार करावा असे प्रतिपादन शिल्पकार एज्युकेशन सिस्टीम मुंबईचे संस्थापक सोपान शेडगे यांनी केले.ते लोणावळा येथे आयोजित ‘ करो तो जानो’ कार्यक्रमात बोलत होते.यावेळी अप्पर पोलिस महासंचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक धनंजय वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना शेडगे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने मनातील नकारात्मक विचार घालवले पाहिजेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक आंतरिक ऊर्जा, शक्ती आहे. ती शक्ती जागृत करून सकारात्मक विचारसरणी वापरुन सुखी, समृद्धी राहु शकतो. यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.ध्यानसाधनेने हृदयातील परमेश्वराला आपण भेटू शकतो. सुखी समृद्धी जिवणाची कला शिकण्यासाठी करो तो जानो या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला पाहिजे. यामुळे आपण प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. या कार्यक्रमास शिल्पकार एज्युकेशन संस्थेच्या ही.ई.ओ. ॲड.प्रिती शेडगे, मेमरी ट्रेनर प्रतिमा जाधव, कोल्हापूर येथील गो ग्रोमोअर सोलुशन संस्थेच्या संस्थापिका रिटा सोनवने , कुसाईवाडीच्या माजी उपसरपंच प्राजक्ता शिंदे,माजी सैनिक ज्ञानदेव चोरगे, प्रल्हाद घरत, संदीप पवार , संदीप माने, कृष्णा मानकर, मनोज इनामदार, गजानन वाघ,शुभम धोंडगे,सुयश पाटील, प्रगती म्हात्रे आदी‌ उपस्थित पस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!