ताज्या घडामोडी
धोडींबा पिराप्पा शेंडगे यांचे निधन
मुरूम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी)
भोसगा, ता. लोहारा येथील प्रगतशील शेतकरी कै. धोडींबा पिराप्पा शेंडगे यांचे शुक्रवारी (ता.४) रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने रात्री ८ वाजता दुःखद निधन झाले. ते ९८ वर्षाचे होते. ते कै. डॉ. कुशाबा धोडींबा शेंडगे व डॉ. राजाराम धोडींबा शेंडगे यांचे वडील होते. डॉ. सचिन कुशाबा शेंडगे यांचे ते आजोबा होते. त्यांच्यावरती त्यांच्या मुळगावी संत मारुती महाराज कानेगावकर आश्रमशाळा, आष्टमोड, भोसगा, ता लोहारा, जि. उस्मानाबाद येथे शनिवारी (ता. ५) रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.