आपला जिल्हाऔद्योगिकमहाराष्ट्रमुळशी

कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या आसवणीसह (इथेनॉल)प्रकल्पाचे व २६ व्या गळीत हंगामाचे उदघाटन .

Spread the love

कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या आसवणीसह (इथेनॉल)प्रकल्पाचे व २६ व्या गळीत हंगामाचे उदघाटन .Inauguration of Sri Sant Tukaram Cooperative Sugar Factory at Kasarsai with Distillation (Ethanol) Project and 26th Gullit Season.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी,३ नोव्हेंबर.

आज दि 3 नोव्हेंबर रोजी झाले.यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व मान्यवर उपस्थित होते.कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखालील व शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुतीमहाराज कु-हेकर,ह.भ.प संतोषमहाराज पायगुडे,यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, देहु संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोरे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद, माजी राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, विलास लांडे, शरद ढमाले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, शंकर शेलार, चंद्रकांत सातकर, बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, संतोष मुऱ्हे, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, गुलाब म्हाळस्कर, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, सुनिल दाभाडे आदीसह कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखान्याच्या कामगारांच्यावतीने भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदीरासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांची देणगी देण्यात आली. प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी कारखान्याची उभारणी, सहवीज प्रकल्प ते इथेनॉल प्रकल्प उभारणीचा आढावा घेतला. कारखान्यावर कुठलेही कर्ज नसून सहवीज, इथेनॉल प्रकल्प उभारणी ही त्याची पावती आहे. हभप संतोष महाराज पायगुडे यांनी आपल्या मनोगतात कारखाना श्री संत तुकाराम महाराजांच्या नावाने असल्याने कारखान्याने हाती घेतलेले काम हे प्रत्यक्ष देवाचे काम असल्याने विना अडथळा पुर्ण होत असून कारखान्याची भरभराट होत आहे.त्याचा फायदा भागातील शेतक-यांना होत आहे. स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी सुत्रसंचालन केलें, संचालक चेतन भुजबळ, तुळशीदास घोलप तर आभार संचालक अनिल लोखंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!