ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने मारली बाजी.

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १५ (प्रतिनिधी) 

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘ भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात काय कमावलं/गमावलं ‘ या विषयावर २१ वी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (ता.१४) रोजी करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी होते. या वेळी प्रमुख अतिथी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची उपस्थिती होती. या वेळी प्रमुख अतिथी पवन इंगळे, परिक्षक प्रा. राजाराम निगडे, गुंडू दुधभाते, स्पर्धक मेघराज शेवाळे, राम जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेतील प्रथम सांघिक पारितोषिक नांदेडच्या यशवंत महाविद्यलयातील साईनाथ महादवाड, नागसेन तुळसे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख दहा हजार रुपये, द्वितीय नांदेडच्या कॉलेज ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, बीजेच्या कृष्णा तिडके, नितीन कसबे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व सात हजार रुपये, तृतीय औरंगाबादच्या माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज कुमारी ऐश्वर्या तनपुरे, रामहरी जाधव यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पाच हजार रुपये तर उत्तेजनार्थ वैयक्तीक प्रतिकुल बाजू मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील कुमारी रुतिका बिराजदार यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपये तर लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील अनुकूल बाजू मेघराज शेवाळे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपयाचे बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजन समितीचे प्रा.गोपाळ कुलकर्णी,प्रा.नागनाथ बनसोडे,डॉ.महेश मोटे,डॉ.सुधीर पंचगल्ले,डॉ. रमेश आडे,डॉ.रवी आळंगे, डॉ.जयश्री सोमवंशी,डॉ. संध्या डांगे,डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी,डॉ.भिलसिंग जाधव,डॉ.महादेव कलशेट्टी, प्रा.सुजाता मुके आदिंनी पुढाकार घेवून स्पर्धा यशस्वी केली.सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी पवन इंगळे, धनराज मंगरुळे, व्यंकटराव जाधव गुरुजी, अशोक सपाटे, गुंडू दूधभाते, राजाराम निगडे व विजेते स्पर्धकांसह अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!