आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

महिला शिपायांकडून मुख्याधिकारी यांना भेटायला न देण्याची कुशलनिती , की काही अर्थकारण ? ?

Spread the love

महिला शिपायांकडून मुख्याधिकारी यांना भेटायला न देण्याची कुशलनिती , की काही अर्थकारण ? ?Is it a strategy not to allow women soldiers to meet the chief officer, or some economic reason? ?

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २५ फेब्रुवारी.

लोणावळा नगरपरिषद कार्यालयात प्रशासकीय आधिकारी कार्यालयाबाहेर एका महिला शिपाई ची अरेरावी लोकांसाठी व पञकारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांना भेटायला न देण्याची कुशलनिती ही महिला वापरत आहे. यामागे काय आहे अर्थकारण ? ? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

ठेकेदार , बाहेरचे लोक भेटायला आले की चिरीमिरी घेवून प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालयात सोडत असल्याने व तुंम्हाला सांगितले विचारल्याशिवाय आत जायचे नाही , तरी आत गेला ..साहेबांची जेवणाची वेळ झाली आहे.
आम्हाला विचारल्याशिवाय आत जायचे नाही , अशी मुजोरी ही महिला शिपाई करत आहे.याबाबत एका पञकाराने नगरपरिषद कार्यालयाला पञही दिले आहे , तरीही ही मुजोरी नागरिक व प्रशासकीय अधिकारी यांच्यामधील संवाद रोखत आहे , याबाबत प्रशासकीय अधिकारी यांनी गंभीर दखल घ्यावी , आणि या मुजोर शिपायाला निलंबित करावे , अन्यथा जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय अधिकारी यांनाच हकालपट्टीला सामोरे जावे लागेल का ?

 

 

नागरी प्रश्नांची उत्तरे जर प्रशासन आधिकारी देत नसतील , तर निवडणूक लांबणीवर न टाकता तात्काळ राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा व उत्तम लोकप्रतिनिधी सभागृहासाठी निवडून देण्याची संधी मतदारांना द्यावी,असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!