ताज्या घडामोडी

समाज बांधवानो,धनगर समाजाला भक्कम,खंबीर नेतृत्वाची गरज आहे…भारत कवितके

Spread the love

भारत कवितके कांदिवली मुंबई
जय मल्हार समाज बांधवानो,होय ,आज आपल्या धनगर समाजाला भक्कम,खंबीर नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.निष्क्रिय,धरसोडपणाचे नेतृत्व काय कामाचे?आज आपला धनगर समाज दिशाहिन,नेतृत्वहिन अवस्थेत जाणवतो.नेतृत्व हिन समाज भरकटलेल्या अवस्थेत असतो.समाजात आज होश आहे पण जोश पाहिजे तसा दिसत नाही. महादेव जानकर साहेबांचे त्यागी व चिकाटी नेतृत्व, आमदार गोपीचंद साहेबांचे झुंझार व लढवय्ये नेतृत्व, राम शिंदे बौध्दिक क्षमतेचे नेतृत्व, दत्तात्रेय मामा भरणे यांचे राजकिय वर्चस्व असलेले नेतृत्व, प्रकाश शेंडगे व रमेश शेंडगे यांचे समाज इतिहासाची माहिती असणारे नेतृत्व, हे जरी आज आपल्या धनगर समाजाला पुरक,पोषक ठरत असले तरीही आज खरी गरज भक्कम, खंबीर नेतृत्वाची आहे. समाज यांचा सदैव ऋणी राहिल.शासनाकडून वारंवार आरक्षण अमंलबजावणी बाबत समाजाची दिशाभूल,चालढकल,फसवणूक ,मेंढ्या पालन करणारे वरील हल्ले,नामांतराचा प्रश्न,हे प्रश्न सोडविण्यासाठी समाज मोठ्या प्रमाणात जागृत आहे,होश आहे पण पाहिजे तेवढा जोश नाही. अशी परिस्थिती आहे. भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा ही शिकवण दिली.त्याप्रमाणे आपला समाज शिकला,थोडा फार संघटीत ही झाला.पण संघर्षासाठी पाहिजे तसा पुढे येत नाही.समाजामध्ये अनेक लहान मोठ्या प्रमाणात संस्था,संघटना,मंडल आहेत.पण त्यांची कार्ये जयंत्या,पुण्यतिथ्या,करण्यात पलीकडे नाहीत.अगदीच वलवाच्या पावसा सारखा.भरीव भक्कम कार्याची त्रुटी जाणवते.अनेक शाखाचा,फांद्याचा एकच वृक्ष असावा.असे मनापासून वाटते.संघटीतपणे आंदोलने न करता विविध ठिकाणी विविध आंदोलने पार पाडतात,त्या समाजात निष्किय होताना दिसतो.तसे न करता सामुहिकरितीने आंदोलनेकरुन समाजहिताच्या काही गोष्टी पदरात पाडून ध्याव्यात.पण तसे होत नाही. याचीच खंत वाटते.समाजात प्रसार माध्यमाचाही सुकाळ आहे, त्यांच्यात ही नेतृत्वाचा अभाव जाणवतो .तेही समाजाचे नेतृत्व करु शकत नाहीत,वाढदिवसाच्या शुभेच्छा, जयंत्या,पुण्यतिथ्या,व निधनाच्या भावपूर्ण श्रद्धांजली च्या बातम्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. समाजाच्या समस्याची उकल व समाजहित यांचे सांकड घालूच शकत नाहीत.त्यांच्यातून एखादे भक्कम,खंबीर नेतृत्व निर्माण होण्याची शक्यता वाटत नाही. भैरोबा,खंडोबा,विठोबा आमच्यासाठी आता धावून या,फक्त एकच व एकमेव भक्कम, खंबीर नेतृत्व द्या.जे समाजाला गती,दिशा देऊन पुढे नेईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!