ताज्या घडामोडी

प्रा.भिमराव गराडे-पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने मांगले गावचे सुपुत्र, संजय गांधी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. भीमराव गराडे-पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र” महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेब व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मा. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री श्री. नाईक, आमदार श्री. नाईक यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमास विश्वासचे संचालक सुरेश पाटील व दत्तात्रय पाटील, माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, सरपंच मीनाताई बेंद्रे, रणजितसिंह नाईक, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, बिऊर गावचे सरपंच सुखदेव पाटील, जयसिंग पाटील, डॉ. सतीश पाटील, माजी सरपंच राहुल पवार, भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!