ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायतमार्फत मी गाडगेबाबा अभियान-शिराळा नगरपंचायतमार्फत मी गाडगेबाबा अभियान

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

स्वच्छतेचे व्रत आजन्म पाळणारे व प्रत्यक्ष कृतीतून जनतेला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिराळा नगरपंचायत कार्यालयाकडून माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत स्वच्छता संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरातील सार्वजनिक विहीर स्वच्छता, जतन व पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने मी गाडगेबाबा अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत शहरातील लोहार गल्ली व विहीर परिसर तसेच कासार गल्ली विहीर व परिसराची स्वच्छता करून घेण्यात आली.या नंतर मारीमी चौक येथे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मा.श्री विजयकुमार जोखे यांनी संत गाडगे महाराजांचे विचार कथन केले, व यांच्या विचार आचरणात आणण्याची सध्याच्या काळातील गरज कथन केली. शिराळा नगरपंचायत चे मुख्याधिकारी मा.श्री योगेश पाटीलसो यांनी कमी कालावधीत नियोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रम व स्वच्छता मोहिमेतील सहभागासाठी उपस्थित परीट समाजातील सन्माननीय तसेच पत्रकार बंधु व इतर नागरिक यांचे आभार मानले. जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रमदानाबरोबरच नगरपंचायत मार्फत करण्यात आलेल्या विहीर व ओढा स्वच्छता उपक्रमातून पारंपारिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परंतु सद्यस्थितीत पूर्णपणे दुर्लक्षिल्या गेलेल्या विहिरी व पाणवठ्यांच्या जतन व सवर्धनाचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. जेणेकरून शहरतील पाणी पुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी होईल. संत गाडगे बाबांच्या कार्याचा गौरव करत असताना जोखे सरांनी मांडलेल्या गाडगे बाबांच्या विचारापासून नवीन पिढी अनभिज्ञ असून नवीन पिढीने हे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. या अभियानात शिराळा शहराच्या नगराध्यक्षा मा. सौ. प्रतिभा पवार संत गाडगे महाराज नागरी पतसंस्थेचे संचालक रमेश यादव, शिराळा तालुका परिट समाज अध्यक्ष रवी यादव तसेच महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ, संत गाडगे महाराज नागरी पतसंस्थेचे सर्व सदस्य शहरातील नागरिक तसेच शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!