ताज्या घडामोडी

मुल्ये व तत्व अव्याहत जीवंत ठेवणारी व्यक्ती म्हणजे अण्णा डांगे होय.

Spread the love

मा . डॉ . डी . टी . शिर्के ,
कुलगुरु शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर .

आष्टा,ता. वाळवा येथील मा. श्री. आण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलामध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संस्था कार्मचारी स्नेह मेळावा , मातोश्री सुभद्रा डांगे स्मृतीदिन व मा . अण्णासाहेब डांगे लिखित तीन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ . टी . डी . शिर्के उपस्थित होते .

यावेळी त्यांनी संस्थेच्या व मा . आप्पांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला . ते म्हणाले , अण्णासाहेब डांगे म्हणजे बहुविद्याशाखीय चालते बोलते विद्यापीठच तुम्हाला मिळाले म्हणून ही संस्था इतकी समृध्द झाली आहे. दूरदर्शनच्या ” उघडा डोळे – बघा नीट ” या उक्तीचा अंगीकार आपण सर्वांनी केला तर आप्पांच्या ठायी असलेली मुल्ये व तत्वे अव्याहत जीवंत ठेवण्यास आपणास नक्कीच मदत होईल म्हणून आप्पांना गुरु माना ! तुमच्या आयुष्यातील काट्यांना ही सुंगध प्राप्त होईल . हे सांगुन आप्पांच्या हातून निर्माण झालेल्या यारी मशीनचे आणि घडीच्या चपातीच्या मशीनचे त्यांनी कौतुक केले . यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ . बी . पी . बंडगर यांनीही आपल्या भाषणामध्ये संस्काराचे मुल्य समजावले . यावेळी शिक्षकांच्या गुणांचा गौरव करीत असताना त्यांनी बंदुकीच्या जोरावरती , हंटरच्या धाकावरती माणसांना वटणीवर आणणा-यांपेक्षा माणसाला वाघासारखे जीवन जगायला शिकविणारा शिक्षक मला प्रिय आहे . यावेळी त्यांनी रस्ता आणि शिक्षक यामधील भेद सांगून प्रोत्साहीत करणारा शिक्षकच विद्यार्थी घडवतो असे ठामपणाने सांगितले . मृत्युनंतरही जीवंत रहायचे असेल तर लिहिते व्हा , नाहीतर लिहिण्या लायक काहीतरी करा . कारण रामाच्या राज्यात राहून ही कैकयी सुधारली नाही व रावणाच्या राज्यात राहूनही बिभीषन बिघडला नाही हा रामायणातील दृष्टांत सांगत त्यांनी संस्कारावरती प्रकाश टाकला .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . अण्णासाहेब डांगे यांनी भुषविले . यावेळी त्यांनी स्वकर्तृत्वावर उभारलेल्या संस्थेचे यश हे माझे नसून हजारोंच्या संख्येने या संस्थेत जोडलेल्या हातांनी केले आहे . हे प्रांजळपणाने मान्य करून मी समाधानी असलेचे सांगितले . यावेळी त्यांनी कामच कामाचा कसा गुरु असतो याचे उदाहरण देत लहानपणापासूनच्या जनसंघापासूनच्या शिस्तीचा पाढा आपल्या भाषणातून व्यक्त केला . यावेळी त्यांनी स्वलिखीत कोण अण्णा डांगे ? यामधील खुज़गांव धरणाचा व चांदोली धरणाच्या निर्मितीचा इतिहास सांगितला . सतत दहा वर्षे चौंडी ता. जामखेड जि . अहमदनगर येथे वास्तव्यास राहून मी माझ्या दोन हातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पसृष्टीची निर्मिती करू शकलो . याचा मला खुप मोठा आनंद आहे .

यावेळी संस्थेमध्ये अध्यक्ष मा.श्री . अण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या कोण अण्णा डांगे ? , पोवाड्यातील होळकरशाही व रानमेवा या तीन पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करणेत आले . तसेच संस्थेतील कार्यरत शिक्षक प्राध्यापक यांनी लिहिलेल्या १२ पुस्तकांचे प्रकाशन करून त्यांना गौरविण्यात आले . यावेळी संस्थेस पेटंट मिळवून देणारे , पी.एच.डी. धारक , नेटसेट व अनुदान प्राप्त करून देणा-या शिक्षक प्राध्यापकांचा सन्मान करणेत आला . यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी कु . निर्मितसिंग चांडोक याचा रु . २० लाख ३० हजार वार्षिक पॅकेज मिळवून प्लेसमेंटमधून आप्लाझो या कंपनीत असोसिएट डाटा सायंटीस्ट म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा सत्कार करणेत आला . यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक यांना दैनिक तरुण भारतच्यावतीने एक्सलंट टिचर व अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाला नवभारत टाईमसच्यावतीने अवॉर्ड मिळवून दिल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करणेत आला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्याचा सत्कार संस्थेचे सचिव, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अँड . राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे व कार्यकारी संचालक प्रो . आर . ए . कनाई यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी स्वागत व प्रास्ताविक अँड . चिमणभाऊ डांगे यांनी केले . यावेळी डॉ . वसंतराव जुगळे , डॉ . एम . आर . शियेकर , श्रीधर हेरवाडे व प्रो . आर . ए . कनाई यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी संस्थेचे खजिनदार श्री . विठ्ठलराव मुसाई , विश्वनाथ डांगे , सत्तु ढोले , सुकुमार लवटे , छगनराव नांगरे , डॉ . आप्पासो पुजारी , जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, अशोकराव देसाई , डॉ . सतीश बापट , सुनिल मलगुंडे , बजरंग कदम , प्रकाश कनप , अविनाश खरात , दत्तात्रय कदम , सुमित पाटील , सी . एच . पाटील , राजेंद्र माने , मदन यादव , सुहास नरुले , श्रीकांत माने , आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे संयोजन सुनिल शिणगारे , दिपक अडसूळ , संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजित माने , विजय पाटील , अजित पाटील , अशोक घोरपडे , आदीने केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . ए . के . पाटील यांनी केले . तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अँड . संपतराव पाटील यांनी मानले.

दुपारच्या सत्रामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला .यामध्ये प्राथमिक आश्रमशाळा , तासगांव व येडेनिपाणी , अण्णासाहेब डांगे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , हातकणंगले , अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , आष्टा , अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल , ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मेडियम स्कूल , आष्टा , आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल , हातकणंगले , अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल , आष्टा , अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ऍन्ड टेक्नॉलॉजी , आष्टा , अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय , आष्टा व श्री . हरिभाऊ म्हानवर माध्यमिक विद्यालय , कारंदवाडी या शाखांनी सहभाग नोंदवीला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!