ताज्या घडामोडी

स्वस्थ सबल भारत” चे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Spread the love

डॉ. भारती पवार, आरोग्य राज्यमंत्री, (भारत सरकार) यांची ही प्रमुख उपस्थिती.

प्रतिनिधि- डॉ.सुनील ना.भावसार

अवयवदान, देहदान नेत्रदान चळवळ समाजात खोलवर रुजावी याकरिता ३-४ सप्टेंबर २२ रोजी स्वस्थ सबल भारत योजनेअंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा आज शुभारंभ NDMC convention center पालिका केंद्र, संसद भवन मार्ग, नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झाला.

केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री डॉ भारती पवार ,माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन ,सिक्कीम चे राज्यपाल श्री गंगाप्रसादजी व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री श्री सुनील मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवयवदान देहदान नेत्रदान या क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील सामाजिक संस्था, व्यक्ती, देशभरातील अनेक transplant surgeon’s यांना एकत्रित एकाच व्यासपीठावर आणणं, संवाद, चर्चा, विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम दिल्ली येथील याच क्षेत्रात गेली ३० वर्षे याच क्षेत्रात काम करणारी संस्था दधिची देहदान समितीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बदलती जीवनशैली, सततचा मानसिक ताण यामुळे अवयव खराब होण्याची संख्या वाढत चालली आहे.
पण त्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नाहीत.
म्हणुन यांचा प्रचार समाजात होण अत्यावश्यक आहे.
यात येणार्या कायदेशीर अडचणी, सरकारी परवानग्या, सामाजिक कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण, सामान्य जनते मधील अंधश्रद्धा, रुढी परंपरा, गैरसमज अशा अनेक गोष्टींवर दोन दिवस चर्चा, ठराव होणं अपेक्षित आहे.
४ सप्टेंबर रोजी महर्षी दधिची जयंती आहे. यानिमित्त देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीपजी धनखड उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून ६० पेक्षा अधिक सामाजिक संस्था, मेडिकल कॉलेज चे प्रतिनिधी आलेले आहेत. सोलापुरातुन “देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था” या संस्थेचे कार्यकर्ते श्री योगिन गुर्जर (पुणेरी सोलापुरकर) हे या अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!