ताज्या घडामोडी

वालनेस हॉस्पिटल मधील उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचा जाहीर पाठिंबा…

Spread the love

दि. ५ जानेवारी २०२२

मिरजेला देशभरात आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते.गेले २ वर्ष कोरोना काळात स्वतच्या जिवाची पर्वा न करता आपण सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले काम अभिमानास्पद आहे. प्रामाणिक, कष्टाळू, निस्वार्थी कर्मचार्यामुळे मिरजेला आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळाला आहे परंतु आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्याची आज खूपच हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हलाखीच्या परिस्थितीतून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वालनेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व मागण्या योग्य असून कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणास सेवक संघटित असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून जाहीर पाठिंबा दिले.

त्याच बरोबर जर येणाऱ्या दोन दिवसात त्या कर्मचारींच्या मागण्या मान्य नाही झाले तर सेवक आरोग्य कामगार संघटनेच्या महानगरपालिका क्षेत्रातील ८०० कामगारांना घेऊन सक्रिय सहभाग घेऊ आणि गरज भासल्यास काम बंद आंदोलन सुध्दा करूअसा इशारा सेवक संघटित असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष उमरफारूक ककमरी यांनी दिली त्यावेळी सोबत महाराष्ट्र प्रदेश सचिव फिरोज मोमीन, उपाध्यक्ष ममता कांबळे मॅडम, खजिनदार तौफिक मिरजकर, सदस्य अमोल कोळी, वासंती निकम, सेरिना नदाफ, नईम मुश्रीफ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!