ताज्या घडामोडी

प्रा. प्रतापसिंग राजपूत यांना हिंदी विषयात पीएच. डी.

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील हिंदी विभागात गेल्या २८ वर्षापासून कार्यरत असणारे प्रा. प्रतापसिंग राजपूत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांचे २२ संशोधन पेपर विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ” रघुवीर सहाय के कथासाहित्य में समकालीन परिवेश ” या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर  केला होता. त्यांनी उस्मानाबादच्या तेरणा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन प्रबंधाचे काम पूर्ण केले होते. पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड, नॅकचे समन्वयक प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत, मअंनिसचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. डॉ. अशोक बेवले, डॉ. रमेश आडे, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. राजू शेख, प्रा. राजकुमार नाईक आदींसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!