आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

कलापिनीचे बालनाट्य आणि बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न…

शिबिराचे हे ३४ वे वर्ष..

Spread the love

कलापिनीचे बालनाट्य आणि बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न…
शिबिराचे हे ३४ वे वर्ष…Kalapini’s Children’s Theater and Children’s Personality Development Camp is full of excitement…This is the 34th year of the camp…

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर ३ मे.

मुलांचा उत्साह वाढवणारे कलापिनीचे बालनाट्य आणि बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न झाले आई कै.कल्पना अरविंद करंदीकर स्मृतीपुष्पांतर्गत शिबिराचा समारोप मोठ्ठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला.

शिबिराची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते नटराज पूजन करुन संपदाताईने शिकवलेल्या गोड आवाजातील ‘असो तुला देवा ‘या साने गुरुजींच्या सुंदर प्रार्थनेने शिबिराची सुरवात चैतन्यमय वातावरणाने झाली आणि तेच चैतन्य, तोच उत्साह १५ दिवस शिबिरामध्ये सळसळत होता.
शिबिराचे हे ३४ वे वर्ष,पहिल्या वर्षी जो आनंद,उत्साह आणि मुलांचा प्रचंड प्रतिसाद आज ३४ वर्षानंतर सुध्दा कायम सातत्याने तसाच टिकून आहे हे या शिबिराचे विशेष उल्लेखनीय यश.शिबिरात पहिली ते तिसरी आणि चौथी ते दहावी असे दोन गट होते.छोट्या गटात श्लोक ,अभिनय गिते,छान छान गोष्टी,अनेक मैदानी खेळ घेतले गेले तसेच वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे मुलांकडून रंगवून घेतले. कागदाच्या घड्या(ओरीगामी) कशा घालायच्या हे सांगून मुलांकडून झाडांची पाने,मनीमाऊ,आणि भिरभिरे अशा वस्तू करवून घेतल्या गोलातून मासा,बेडूक,कासव कसे काढायचे आणि अनेक कार्टून्स हे खूप सोप्या आणि छान पध्दतीने मुलांना शिकवले.एक दिवस सर्व मुलांना गोष्टीची पुस्तके वाचायला,हाताळायला दिली.सगळ्यांनाच मराठी वाचता येत नसल्याने काहीनी त्यातली नुसती चित्रे बघून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.

कलापिनितून च बाल कलाकार म्हणून मोठी झालेली अदिती अरगडे ने छोट्या गटातील मुलांचे “ढगांच घरट् सोडून दूर” आणि “सुट्टी सुट्टी” हे दोन्हीही डान्स अतिशय सुंदर बसवले.
वरील सर्व घेण्यासाठी मधुवंती रानडे,ऋचा पोंक्षे,मीरा कोन्नुर, ज्योती ढमाले, केतकी लिमये, राखी भालेराव, सुप्रिया खानोलकर,चांदणी पांडे यांनी मोलाचं योगदान दिल.
मोठ्ठ्या गटाला तर अनुभवी ताई दादा यांचं मार्गदर्शन मिळत होतं. संपदा थिटे यांनी मुलांकडून सरगम, प्रार्थना आणि विविध गाण्यांचे प्रकार शिकवले. सूत्र संचालन, चित्र कथा कशी तयार करायची आणि त्यावर संवाद तयार करायची,प्रसंग नाट्या बद्दल मोलाची माहिती देण्यात आली. सगळे दादाताई कलापिनीच्या मुशीतूनच घडलेले कलाकार आहेत,आता ते आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.या सगळयांनी १५ दिवसांच्या छोट्या कालावधीत सुध्दा मुलांना किती भरभरुन दिले.

त्यासाठी प्रतीक मेहता,अभिलाष भवार चैतन्य जोशी,संदीप मंवरे,निनाद पाठक,तुषार देशपांडे,मीनल कुलकर्णी,वैभवी तेंडुलकर,मयुरी जेजुरिकार,माधुरी ढमाले कुलकर्णी,विनया केसकर यांनी अभिनय, सुत्रसंचालन,किल्ल्यांची माहिती,रेडिओवर सादर करण्याची कला,डान्सच्या स्टेप्स, शॉर्ट फिल्म विषयी खूपच छान माहिती दिली. प्रसंगनाट्य,तालातून लय साधत स्वर तयार करणे अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी मुलांना शिबिरातून शिकायला मिळाल्या.साहित्य वाचा,भाषणं ऐका,डायरी लिहा हे मुलांना मुलांना सांगण्यात आले ..
मुलानां ‘मिंग्लीश मिडियम ‘आणि’ नारद झाला गारद ‘ ही दोन बालनाट्य, बालनाट्यमहोत्सवाच्या निमित्याने पाहायला मिळाली.सुंदर सुंदर विषयांवर मोठ्ठी मुलं छोट्या मुलांबरोबर संवाद साधत होती.

 

समारोपात समारंभात प्रमुख पाहुणे.मुकुंद दाते आणिअरविंद करंदीकरांनी आपल्या मनोगतात मुलांना प्रोत्साहन द्या आणि त्यांची प्रेरणा बना असे पालकांना सांगून सर्व शिबिरार्थींचे आणि प्रशिक्षिकांचे कौतुक केले. पल्लवी महाजन आणि राजगुरव यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले… मुलांना एव्हढे सगळे १५ दिवसात शिकायला,अनुभवायला मिळाले याबद्दल समाधान व्यक्त केले….तसेच विद्यार्थ्या तर्फे छोट्या गटातील रेणू सहस्त्रबुध्दे, ईशान अभ्यंकर,आराधना राजहंस आणि स्वरा पन्हाळे या मोठ्या गटातील मुलांनी शिबिराबद्दल, नवीन मित्र मैत्रिणी मिळाले ,नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगितले..मुले शिबिरात येतात तेव्हा त्यांना अभिनयाबद्दल काहीही माहिती नसतं पण इथं आल्यानंतर स्टेजवर येवून बोलायला शिकतात आणि नंतर कलापिनीच्या स्टेजवरुन राष्ट्रिय,आंतरराष्ट्रीय असा अभिनयाचा प्रवास सुरु होत राहातो.तेंव्हा मुलांना बालभवन,कुमारभवनला पाठवा असे कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.कार्यक्रमाचं सुत्रसंचालन रश्मी थोरात यांनी अतिशय नेटके आणि छान केले.

शिबिराचे उत्कृष्ट नियोजन सगळ्यांना बरोबर घेवून कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे यांनी केले होते. श्री.रामचंद्र रानडे, विशाखा देशमुख,अनघा बुरसे,नीता धोपाटे यांची खूप मदत झाली.
मुलांनी शिबिरातून बरोबर काय नेलं? तर त्यांना पुढे नेणारा आत्मविश्वास,संवादकौशल्य, आणि बरंच काहीssssएकंदरीत शिबिर म्हणजे भरपूर धम्माल,दंगा मस्ती,हसणं,खेळणं आणि नाचणं,बागडणं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!