ताज्या घडामोडी

सौ. मुमताज उल्डे यांची समतावादी महासंघाच्या महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी निवड

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा )

सदरची माहिती अशी की, इस्लामपूर येथे रेस्ट हाऊसवर समतावादी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती,सदरच्या या बैठकीत समतावादी महासंघाच्या महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी मुमताज उल्डे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी समतावादी महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. अश्विनीताई चांदणे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय चांदणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. भानुदास (बाबा) बल्लाळ, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. सोनालीताई आवळे, जिल्हा उपाध्यक्षा सौ. सविताताई काळे, तालुका निरीक्षका सौ. छायाताई मस्के, जेष्ठ नेते मा. भिमराव मस्के उर्फ बापू, जिल्हा निरीक्षक मा. मानसिंग बल्लाळ, वाळवा तालुका अध्यक्ष मा. प्रकाश रणखांबे, वाळवा येथिल महिला पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!