ताज्या घडामोडी

पालघर तालुक्यातील विशाल पावडे बनले शासनाच्या सायबर विभागाचे पहिले उपसंचालक

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील किराट गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विशाल सुभाष पावडे यांची राज्य शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या न्याय सहायक प्रयोगशाळेच्या सायबर गुन्हे व टेप विभागाच्या उपसंचालक या पदासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून निवड झाली आहे.

सायबर विभागाचे उपसंचालक हे सर्वोच्च पद असून या पदासाठी निवड होणारे विशाल पावडे हे पहिलेच अधिकारी आहेत. सध्या विशाल पावडे हे सहायक संचालक या पदावर कार्यरत असून त्यांनी सहायक संचालक म्हणून काम करत असताना त्यांचे काम करण्याचे कौशल्य, बुद्धिमत्ता आणि काम करण्याची पद्धत तसेच अतिशय मेहनत घेवुन सायबर डिपार्टमेंट व तासी डिपार्टमेंट चे नवीन आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन केले आहे.

नुकताच त्यांनी एका संवेदनशील अशा बलात्कार व खुनाच्या प्रकरणात गुन्हेगाराला ओळखण्यासाठी गेट अनलाईसेस या नवीन पद्धतीचा पहिल्यांदा राज्यात वापर केला. सदरच्या तांत्रिक पद्धतीच्या वापरामुळे आरोपीला कोर्टाने फाशीची शिक्षा देण्यास मदत झाली. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पावडे यांना राज्याच्या महासंचालक (न्यायिक व तांत्रिक ) कडून विशेष गौरविण्यात आले आहे.

विशाल पावडे हे सायबर क्षेत्रात एक वरिष्ठ डिजिटल फॉरेन्सिक तज्ञ आहेत. आत्तापर्यंत त्यांनी मुंबईतील २६/११ अतिरेकी हल्ला व बॉम्बस्फोट पासून तर पालघर मधील साधू हत्याकांड अश्या अनेक प्रकरणांत शासनाच्या बाजूने तांत्रिक योगदान दिले आहे.

विशाल पावडे यांचे शालेय शिक्षण पालघर तालुक्यातील आत्ताच्या स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथे झाले आहे. वडिलांच्या अकाली निधनाने खचून न जाता अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आईने विशाल आणि त्यांचा मोठा भाऊ पंकज आणि बहीण सिंकल यांना उच्च शिक्षण देऊन समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालघर तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!