महाराष्ट्र
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
आज १ मे २०२२ रोजी मुस्लिम एज्युकेशन सोसयटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला गेला.
महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण हे दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या पहिल्या बैचचे विद्यार्थी असलेले आणि जांभारी गावातील अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्ती इब्राहीम इस्माइल भाटकर यांच्या हस्ते करणेत आले.ध्वजारोहण कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष श्री रहीम हसन माद्रे तसेच इलियास अहमद माद्रे ,जनरल सेक्रेटरी रुमान पारेख, शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर सर्व कर्मचारी वर्ग, सैतवडे गावातील घुमटकर ग्रूप चे संस्थापक सरफराज चिलवान आणि जांभारी गावचे अनके प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.