आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे ५५ वे मिनी कन्व्हेन्शन संपन्न..

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने विविध उद्योग समूहात विविध प्रकारच्या वस्तु उत्पादीत करीत असलेल्या वस्तूंची गुणवत्ता सुधारणे, उत्पादकता वाढविणे, ग्राहकांना अपेक्षितपूर्तीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे, वस्तूंचे वितरण व्यवस्था, सुरक्षा, गुंतवणुकीत होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना राबविणे..

Spread the love

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे ५५ वे मिनी कन्व्हेन्शन संपन्न..

आवाज न्यूज चिंचवड प्रतिनिधी गुलामअली भालदार २८ जुलै:

क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये टाटा, किर्लोस्कर, मिंडा, कमिन्स, जेसीबी, स्पायसर, शिंडलर, दाना, उद्योग समूह, जी.ई. इंडस्ट्रिज, कॅडबरी इंडस्ट्रिज समवेत आदी सुमारे ४९ उद्योगसंस्थेतील १८० संघांनी सुमारे ५०० अधिक स्पर्धकांनी ५५ वे मिनी कन्व्हेन्शनमध्ये सहभाग नोंदविला. क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने विविध उद्योग समूहात विविध प्रकारच्या वस्तु उत्पादीत करीत असलेल्या वस्तूंची गुणवत्ता सुधारणे, उत्पादकता वाढविणे, ग्राहकांना अपेक्षितपूर्तीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे, वस्तूंचे वितरण व्यवस्था, सुरक्षा, गुंतवणुकीत होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना राबविण्यात आणल्या गेल्या. या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध स्पर्धकांनी परीक्षकांसमोर वरील विषयाला अनुसरुन केस स्टडी प्रेझेन्टेशन केले, त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दोन सत्रात झालेल्या स्पर्धेत विविध उद्योग समुहातील विजेत्या संघाला सुवर्ण, रौप्य व रजत पुरस्कार, स्मृतीचिन्ह स्वरुपात फोरमचे पदाधिकारी परवीन तरफदार, भुपेश मॉल, अनंत क्षीरसागर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण संतोषकुमार रामचंद्र, पवनकुमार रवंदळ, दिपक कासार, राहुल काशीकर, रणजीत जाधव, श्यामकांत दिक्षीत, अभिजीत देशपांडे, विश्वनाथ मोरे, शैलेश तुपे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले, ललिता परदेशी यांनी केले. तर, संयोजन चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे, सुनिल वाघ, रहीम मिर्झा बेग यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!