ताज्या घडामोडी

शिर्डी नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचे नगरपंचायत आकारत असलेले सर्व प्रकारचे कर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने भरण्यासाठी निवेदन

Spread the love

मा.ना.आशुतोष दादा काळे
अध्यक्ष- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी.

महोदय,
वरील विषयी आम्ही खालील सह्या करणारे सर्व नगरसेवक विनंती करतो की, श्री साईबाबा संस्थानने यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धार्मिक,शैक्षणिक,आपत्ती काळात तसेच विविध विकास कामांसाठी अनेक वेळा शेकडो कोटी रुपयांची मदत केली आहे.तसेच बिहार,केरळ सह आणखी काही राज्यांना अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.परंतु सामान्य शिर्डीकर नागरिकच आता रोगराईच्या आपत्तीचा बळी ठरत आहे.कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे लॉकडाउन सुरू झाले.त्याच वेळी श्री साईबाबांच्या मंदिराचे दरवाजे देखील बंद झाले. देशात आणि महाराष्ट्रात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर 2019,2020,2021 आणि 2022 या नवीन वर्षासह या संपूर्ण कालावधीत लॉकडाऊनचे निर्बंध कमी होत जाऊन सर्व प्रकारचे व्यवहार त्यातली त्यात आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत गेले व आले आहेत.परंतु शिर्डीची परिस्थिती आजही अत्यंत वेगळी व लॉकडाऊन सदृश आहे.कोरोनाच्या पहिल्या,दुसऱ्या,तिसऱ्या लाटेचा आणि आता नव्याने आलेल्या ओमिक्रॉन चा फटका शिर्डीकरांना प्रकर्षाने बसला आहे.श्री साईभक्तांच्या रोडावलेल्या गर्दीमुळे छोटे,मध्यम आणि मोठे असे सर्वच व्यवसायिक अडचणीत आले आहे.बेरोजगारी वाढली आहे.नगरपंचायतचे वेगवेगळे कर,लाईट बिल,दैनंदिन मूलभूत गरजा यासाठी ही आर्थिक तरतूद करणे सामान्य शिर्डीकरांना शक्य होत नाही. या आर्थिक संकटामुळे कौटुंबिक कलह,आत्महत्या,बँकांच्या कर्जाचा भरणा या आणि अशा अनेक समस्या समोर येत आहे.आजही शिर्डीच्या आजूबाजूच्या शहरांची बाजारपेठ पूर्वपदावर आल्याचे आपणास दिसेल परंतु साईभक्तांवर अवलंबून असलेले शिर्डीकर यांचे व्यवसाय व शिर्डीची बाजारपेठ पूर्वपदावर आल्याचे दिसत नाही.श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या आतापर्यंतच्या इतिहासात डोकावून पाहिले तर वर उल्लेख केल्याप्रमाणे शेकडो कोटी रुपये श्री साईबाबा संस्थानने सढळ हाताने मदत म्हणून दिले आहे.आज त्याच श्री साईबाबांच्या नगरीतील शिर्डीकर नागरिक अडचणीत आहे.त्यांना आज खऱ्या मदतीची गरज आहे.
तरी महोदय आपणास अतिशय आग्रहपूर्वक व मनपूर्वक विनंती आहे.की कोविडच्या लॉक डाउन कालावधीतील शिर्डीकरांकडून शिर्डी नगरपंचायत आकारत असलेल्या सर्वप्रकारच्या करांचा बोजा श्री साईबाबा संस्थानने उचलावा ही विनंती.
प्रत.,
सन्मा.भाग्यश्री बानायात.(IAS)
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी.

आपले नम्र..
आरती सचिन चौगुले. नगरसेविका.
अर्चना अमृत गायके. नगरसेविका.
अनिता सुरेश आरणे. नगरसेविका.
सचिन नानासाहेब चौगुले. नगरसेवक.
प्रसाद प्रकाश शेळके. नगरसेवक
सुरेश काळू आरणे.नगरसेवक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!