ताज्या घडामोडी
केर्ली येथे जोतिबा यात्रेकरूंना महाप्रसाद वाटप
कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)
केर्ली तेथे जोतिबा फाट्यावर प्रगतशील शेतकरी किरण शिंदे यांनी जोतिबा यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप केले आहे. ते ही परंपरा अनेक वर्षापासून चालवत आहेत. चैत्र यात्रेला मोठी गर्दी होते. या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप ते गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत. खासकरून कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. ही परंपरा कायमच चालू ठेवण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.