ताज्या घडामोडी

पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर चे इमारत पूर्ण करून मंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

Spread the love

साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळा ची इमारत पूर्ण करून हस्तांतरित करण्याबाबत व सुविधा पुरवण्या बाबत निवेदन नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच सादर केले आहे निवेदन सादर करते वेळी पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री प्राध्यापक शिवाजीराव पाटील , सचिव शिवाजी मोहन पाटील , उपाध्यक्ष उमाकांत नाईक, कोषाध्यक्ष शालिग्राम पाटील, सहसचिव राजेंद्र नवसारीकर, संचालक मंडळ– अजबराव पाटील, श्रावण पाटील ,कृष्णा आनंदा पाटील, केशवराव बोरसे सर्व कार्यकारणी सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून त्याबाबत चर्चा देखील केली ज्या सुविधांचा अभाव आहे त्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करत असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी सोचालयची उपलब्धता करून देण्यात यावी लाईट फिटिंग, विद्युत पुरवठा ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्या व ओपन जागेमध्ये गार्डन तयार करून ज्येष्ठांसाठी सुविधा करून देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अडचणी सोडवुन देण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. लवकरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करण्यात देण्याबाबतचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला आहे.मंडळाने त्यांना धन्यता दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!