ताज्या घडामोडी

येडेनिपाणी येथे”नागवेल सुवर्ण योजना”बक्षीस वितरण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील नागवेल महिला सहकारी दूध संस्थेमार्फत कै. राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नागवेल सुवर्ण योजना बक्षीस वितरण सोहळा, दीपावली ठेव व रिबेट वाटप सोहळा पार पडला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण व दीपावली भेट देण्यात आली. यावेळी त्यांनी मनोगतही व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिताताई जाधव, राजारामबापू कारखाना संचालक भगवान पाटील, नागवेल संस्थेच्या अध्यक्ष वत्सला पाटील, राजारामबापू बँक संचालक डॉ. प्रकाश पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक बंडा नांगरे , सी. एच. पाटील, माणिक पाटील, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, नामदेव शेवाळे, शंकर पाटील, संजय पाटील, रायसिंग पाटील, दिलीप पाटील, इस्लामपूरचे माजी नगरसेवक शंकरराव चव्हाण, संदीप पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील अलकाताई माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत कदम संस्थेचे सर्व सभासद व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!