ताज्या घडामोडी

येडेनिपाणी येथील बेवारस व्यक्तीस अखेर खाकी वर्दीतील कुरळप पोलीस स्टेशनचे हवालदार सुरेश पाटील यांनी निवारा देण्याचे केले काम

Spread the love

येडेनिपाणी तालुका वाळवा येथील बेवारस तथा बुधवार नावाच्या व्यक्तीस अखेर खाकी वर्दीतील देव माणूस कुरळप पोलीस स्टेशनचे हवालदार सुरेश पाटील यांनी पोलिस स्टेशन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सावली बेघर संस्था सांगली येथे सोडून त्यावेळेस त्या माणसाला निवारा देण्याचे पुण्य केले तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे जो जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा याप्रमाणे सुरेश पाटील यांनी त्या वेड्या पुरुषाला निवारा देण्याचे पुण्य केलं सुरेश पाटील यांना पंचवीस ते तीस पुरस्कार मिळालेला असून त्यांचं परिसरातून कौतुक होत आहे येडेनिपाणी गावात गेले पाच वर्ष बेवारस पुणे वावरणारा पुरुष गावात मिळेल ती खाऊन येडेनिपाणी राहत होता गावातील लोकही त्याला सकाळ संध्याकाळी खायला देत होते मोरया ग्रुप चे सदस्य अभिषेक पाटील व सुरेश पाटील यांनी त्यात कुठेतरी निवारा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले अखेरीस गुरव पोलीस स्टेशन संपर्क साधून पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी हवालदार सुरेश पाटील यांनी सावली बिगर संस्था सांगली शी संपर्क साधून संस्थेत दाखल करण्याचे ठरवले व अभिषेक पाटील व हवालदार सुरेश पाटील यांनी त्यास पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत पत्र घेऊन सांगलीच्या सावली बेघर संस्थेत सोडले व त्या निराधार व्यक्तीला निवारा मिळाल्यानंतर फार मोठे समाधान अभिषेक पाटील व खाकी वर्दीतील देव माणूस सुरेश पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत होते यावेळी कुर्ला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव सरपंच डॉक्टर सचिन पाटील सावली बेकर संस्थेचे मुस्तफा मुजावर यांचे विशेष सहकार्य लाभले अजूनही समाजात माणुसकी जागा असल्याचे व खाकी वर्दीतील माणूस पण समाजाला दिसून आले त्याबद्दल या खाकी वर्दीतील माणुसकीला लोकांचा सलाम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!