ताज्या घडामोडी

महिलांच्या न्याय हक्कासाठी समतावादी महासंघ आक्रमक भूमिका घेऊन काम करणार— डॉ.विजय चांदणे.

Spread the love

सविस्तर असे कि, सोमवार दि.२२/०८/२०२२ रोजी तासगाव येथे समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष-डाॅ विजय चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ विजय चांदणे म्हणाले,कि समतावादी महासंघ ही सामाजिक संघटना आहे, सर्व सामान्य लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी समतावादी महासंघ अतिशय आक्रमक भूमिका घेऊन काम करत आहे. समतावादी महासंघ ही महिलांचा सन्मान करणारी व त्यांच्या न्याय हक्कासाठी प्राधान्य देऊन काम करत आहे.त्यामुळेच समतावादी महासंघात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.ही गोष्ट विशेष कौतुकास्पद आहे.
यावेळी महिला आघाडीच्या महत्त्वपूर्ण निवडी करण्यात आल्या. या वेळी सौ.दिपाली मुकुंद पुंडेकर,रा.तासगाव, सांगली नाका,यांची
समतावादी महासंघ महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्षा पदी निवड करण्यात आली.
सौ.निकिता अजय पटकारे,यांची
सांगली जिल्हा उपाध्यक्ष, महिला आघाडी पदी निवड करण्यात आली. सौ. रुपाली रोहित पोतदार,यांची
तासगाव तालुका उपाध्यक्ष पदी
सौ. रोशन सतीश जावळे,यांची
तासगाव शहर अध्यक्ष पदी
सौ.वैशाली क्रुष्णात यादव,यांची
सुखवाडी विभागप्रमुख पदी
मा.लक्ष्मण दत्तू पाटील,यांची
तासगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष-डाॅ विजय चांदणे यांच्या हस्ते सर्व नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी समतावादी महासंघाचे या.प्रदेशाध्यक्ष मा.अतुलदादा चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.भानुदास बल्लाळ, सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.रामभाऊ लांडगे, सामाजिक कार्यकर्ते मा.मुन्नाभाई कोकणे,मा.सनी बल्लाळ,सौ.सुनिता माने,सौ.सुरेखा शिंदे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!