ताज्या घडामोडी

पी.व्ही.पी. महाविद्यालयात एमओयू अंतर्गत अतिथि व्याख्यान

Spread the love

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी
(दि. ९) येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाचा आदर्श महाविद्यालय विटा येथील संख्याशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (सुस्टा) यांच्यामध्ये सामंजस्य करार (एम.ओ.यु.) झाला आहे. याअंतर्गत नुकतेच पी.व्ही.पी. महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संख्याशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक आणि सुस्टा सदस्य एस. व्ही. राजगुरू यांचे कवठेमहांकाळ आणि विटा येथील बी. एस्सी. भाग तीन च्या विद्यार्थ्यांसाठी ‘अनालिसिस ऑफ नॉननॉर्मल डेटा’ या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा. राजगुरू यांनी ‘संख्याशास्त्रामध्ये नेहमीच एखादे मॉडेल वापरण्यापूर्वी काही गृहितके मांडावी लागतात. संबंधीत गृहितकांच्या सत्यतेवर-असत्यतेवर मॉडेलचे यशापयश अवलंबून असते. अनुमान काढणेसाठी किंवा तुलना करणेसाठी जी माहिती गोळा केली जाते ती प्रसामान्य संभाव्यता वितरणा चे अनुकरण करते, असे बहुतांशी गृहीत धरले जाते. तथापि, नेहमीच हे गृहीतक सत्यात उतरत नाही. अशा प्रसंगी माहितीचे विश्लेषण करताना तिचे वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतर करून विश्लेषण करावे लागते’ असे सांगून ‘क्रुस्कल-वाली कसोटी’ सह इतर पद्धतींचे सविस्तर आणि सोदाहरण स्पष्टीकरण केले. यावेळी पी.व्ही.पी. महाविद्यालय आणि आदर्श महाविद्यालय विटा येथील संख्याशास्त्राचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. अतिथी व्याख्यानाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. विजय कोष्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शीतल पाटील आणि प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले. व्याख्यानाचे नियोजन प्रा. गणेश सातपुते आणि प्रा. अभिलाष पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!