ताज्या घडामोडी

गणपतीपुळे येथील श्री.गणपती श्री विक्रम केळकर यांच्याकडून मालगुंड एज्युकेशन सोसायटीला एक लाखाची देणगी

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे गावचे सुपुत्र, रेल्वेमधून सिनियर इंजिनीयर म्हणून निवृत्त झालेले,बळीराम परकर विद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व श्री.गणपती श्रीविक्रम केळकर यांनी मालगुंड शिक्षण संस्थेला संगणक संच व प्रयोग शाळेसाठी एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
श्री.गणपती केळकर हे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते मालगुंड प्रशालेतील माजी शिक्षक मोरेश्वर केळकर यांचे ते भाऊ होय. मालगुंड एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते रेल्वेमध्ये नोकरीला लागले. रेल्वेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे इंजिनिअर म्हणून काम केले. नोकरीतून निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी मालगुंड शिक्षण संस्थेला सामाजिक बांधिलकीतून एक लाखाची आर्थिक मदत केली आहे.
एक लाख रुपयांचा धनादेश मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर व शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव विनायक राऊत यांच्याकडे श्री. गणपती केळकर व केळकर कुटुंबियांनी सुपूर्द केला.यावेळी निवृत्त इंजिनियर
श्री.गणपती केळकर यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.केळकर, मुलगा डॉ.उदय केळकर उपस्थित होते.आमच्या शिक्षण संस्थेच्या विकासासाठी अतिशय मोलाची आर्थिक मदत देणगीरुपाने दिल्याबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेचे उपक्रमशील चेअरमन बंधू मयेकर, उपक्रमशील सचिव विनायक राऊत यांनी देणगीदार गणपती केळकर व केळकर कुटुंबियांना मनापासून धन्यवाद दिले.
थोर शिक्षणप्रेमी व थोर देणगीदार श्री.गणपती श्रीविक्रम केळकर व केळकर कुटुंबियांच्या दातृत्वाचे मालगुंड-गणपतीपुळे परिसरातील कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!