ताज्या घडामोडी

उमरगा व लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी)
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा व लोहारा तालुक्यातील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता. २०) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची विचारधारा व विकासाचे राजकारण या मुद्द्यावर निवडणुकीत प्रचार करण्यात आला होता. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आहोरात्र मेहनत घेऊन शिस्तबद्ध नियोजन करून सर्व गावांमध्ये सभा, पदयात्रा, गाठीभेटी व मतदारांची प्रत्यक्ष संवाद साधल्याने दोन्ही तालुक्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळविता आले. उमरगा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने भरघोस यश संपादन केले असून यापैकी तब्बल ११ ग्रामपंचायतमध्ये तर लोहारा तालुक्यातील १२ पैकी ३ ग्रामपंचयातवर कॉंग्रेसचे सरपंच निवडून आलेले आहेत. उमरगा तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भुसणी, येणेगुर, आलुर, बेळंब, औराद, धाकटीवाडी, मळगीवाडी, वरनाळ, महालिंगरायवाडी, कोराळ, एकुरगा या ग्रामपंचायतवर कॉंग्रेसने सत्ता संपादन केली. लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतपैकी सालेगांव, विलासपूर पांढरी व वडगांववाडी या ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसने यश मिळवले आहे. या निकालामुळे कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण असून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांचा मुरूम येथे बापूराव पाटील व शरणजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे निवडून आलेल्या विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा बापूराव पाटील, शरण पाटील यांच्या हस्ते सत्कार करताना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!