ताज्या घडामोडी

माणगाव येथे आदिवासी भवन होण्याची रासपाची मागणी

Spread the love

प्रति, मा. ना. के. सी. पाडवी साहेब, आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य.

विषय: माणगाव येथे आदिवासी भवन होण्याबाबत …

वरील अनुषंगाने आपणास विनंती पूर्वक सुचित करण्यात येत आहे की, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दुर्गम भागासहीत मोठ्या संख्येने आदिवासी समाज विखुरलेल्या अवस्थेत आपले जिवन जगत असुन, विकासापासुन कोसो दुर आहे. या समाजास विकासाच्या मुद्द्यावर मुख्य तालुका स्थळावर एकत्रित येण्यास हक्काचे व्यासपीठ नसल्याने तालुक्यात दुर्गम भागासह विखुलेला समाज एकत्र व्यासपीठावर बोलावून संवाद साधनं अनेकदा अडचणीचं ठरत असल्याने, कृपया मा. महोदय सदर माणगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीन विकासाच्या हेतुने, माणगाव येथे आदिवासी भवन बांधण्यात यावे हि नम्र विनंती.

धन्यवाद ! कळावे

आपला कृपाभिलाशी

संतोष ढवळे- धनवीकर रा.स.प. संपर्क प्रमुख जि. रायगड.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण अध्यक्ष भगवानराव ढेबे, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, रासप नेते श्रीकांतदादा भोईर, रायगड संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनवीकर, उत्तर रायगड अध्यक्ष संपत ढेबे, उरण विधानसभा अध्यक्ष दिपकशेठ पाटील, जेष्ठ समाजसेवक बबनशेठ डावले, रा.स.प. युवा नेते दिनेशशेठ हुंबे, युवा अध्यक्ष रोहिदास झोरे,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!