आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पुन्हा एकदा वर्चस्व.

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पुन्हा एकदा वर्चस्व.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १ डिसेंबर.

. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व मुली , तसेच १७ वर्षाखालील मुले यांच्या संघाने तालुकास्तरीय खो – खो स्पर्धा जिंकून आपले मावळ तालुक्यात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले आहे . आता या सर्व संघांची निवड जिल्हा पातळीसाठी झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचनालय , महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्यातर्फे सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल मध्ये गेल्या तीन दिवसांपासून तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणी तालुक्यातील अनेक शाळातील संघ सहभागी झाले होते. त्यात तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुले व मुली यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आपली चुणूक दाखवली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडाशिक्षक  गोरख सर व . सुवर्णा झणझणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोजच्या सरावामुळेच हा विजय आम्ही प्राप्त करू शकलो अशी सर्व विजेत्यांची मते होती. या सर्व संघांचे संस्थेचे संस्थापक  चंद्रकांत काकडे संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे शाळेच्या मुख्याध्यापिका . मीना अय्यर यांनी खूप खूप अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!