ताज्या घडामोडी

माजी विद्यार्थी कारळे बंधूंकडून ‘ शैक्षणिक साहित्य वाटप ‘

Spread the love

खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री,विद्यमान विरोधी पक्षनेते आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य तसेच पांडूरंग कारळे यांच्या वाढदिवसानिमित्त हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने शैक्षणिक साहित्य वाटप करताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खारीचा वाटा उचल्याचे समाधान वाटते असे पांडूरंग कारळे म्हणाले.यावेळी विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी रघुनाथ यादव यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत खेडेकर यांनी केले.शैक्षणिक साहित्य मिळविण्यासाठी जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी पाठपुरावा केला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून देऊ शकलो याचे समाधान वाटते असे शशिकांत जाधव म्हणाले. शैक्षणिक यावेळी पांडूरंग कारळे,विजय कारळे,रघुनाथ यादव,म्हाळसाकांत खेडेकर,डी.बी.यादव शशिकांत जाधव यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.आभार पर्यवेक्षक डी.बी.यादव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!