ताज्या घडामोडी

गांधलीपुरा भागातील वस्तीसाठी शेतकी संघाच्या वरील जागेत मंगल कार्यालय निर्माण करणार-आ.अनिल पाटील

Spread the love

हजरत बाबा ताज फाऊंडेशनच्या वतीने स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीचे उद्घाटन!!

अमळनेर-तरुण पिढीला शिक्षण आणि वाचनाच्या दिशेने नेने हा खरोखरच स्तुत्य उपक्रम असून यामुळे खऱ्या अर्थाने समाज समृद्ध होणार आहे, हजरत बाबा ताज फाऊंडेशनने सुरू केलेल्या स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररीचा मुस्लिम समाजातील जास्तीतजास्त तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले.
हजरत बाबा ताज फाउंडेशन संचलित अल्लामा फजले हक खैराबादी (रहे) स्टडी सेंटर ( अँड ) पब्लिक लायबरीचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जळगाव येथील माजी उपमहापौर करीम सालार,महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय नियोजन समितीच्या शासन नियुक्त सदस्या सौ रिताताई बाविस्कर,राष्ट्रवादी चे प्रदेश चिटणीस ऐजाज मलिक,शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील,ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,संदीप घोरपडे ,प्रा.अशोक पवार,प्रविण पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,बन्सीलाल भागवत,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,शेतकी संघ प्रशासक सदस्य आलिंम मुजावर,हाजी मजीद जेकरिया मेमन,अँड जुबेर खान आदी मान्यवर उपस्थित होते.सदर स्टडी सेंटर गांधलीपुरा भागातील अजिंता टॉकीज शेजारी सुरू झाले आहे.आपल्या मनोगतात पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की तुम्ही जागेची व्यवस्था करा ग्रंथालय बांधण्यासाठी मी एक करोड रुपये निधी उपलब्ध करून देईल, गांधलीपुरा परिसरात गोरगरिबांची वस्ती असल्याने येथील शेतकरी सहकारी संघ च्या इमारतीत वरच्या भागात भव्य मंगल कार्यालय निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगत शुभसंकेत दिले,तसेच ग्रंथालय साठी आमदार निधीतून एक संगणक संच देण्याची घोषणा आमदारांनी केली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविक हजरत बाबा ताज फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज मौलाना यांनी केले. ग्रंथालयाचे उद्घाटन माळी समाजाचे युवा नेते महेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अल्लमा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) यांच्या नावाने या भागातील गोरगरीब लोकांना चादरी वाटप करण्यात आले, याप्रसंगी पाच लोकांची विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल फाऊंडेशन च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड रज्जाक शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रियाज मौलाना, कमरोदीन शेख, अखलाख शेख, रहिम मिस्त्र, शब्बीर शेख, इबु मिस्त्री मट्या खाटिक, इकबाल शेख, रईस शेख, शराफत अली मुसतफा शेख, नूरोद्दीन शेख, शाहिद अली, राशिद शेख, सैय्यद,जाकिर शेख, आंदिनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!