ताज्या घडामोडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वांबोरी येथील प्रसाद शुगरच्या गव्हाणीत उड्या घेऊन तीव्र आंदोलन

Spread the love

(राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे)

जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना कारखाने बंद  ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान स्वाभिमानीने केले होते

जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आक्रमक होत कारखानाच्या गव्हाणीत उडी घेत कारखाना बंद पाडला.चालू वर्षाच्या एफआरपी पेक्षा 350 रुपये ज्यादा भाव देण्याची मागणी स्वाभिमानीने केली होती.सर्व कारखानदारांनी काटे ऑनलाइन करत शेतकऱ्यांची लुटमार थांबवावी अशा प्रमुख मागण्यांसह स्वाभिमानीने संघटनेने आक्रमक होत आंदोलन पुकारले होते.

जिल्ह्यातील एकही कारखाना चालू देणार नाही स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली 17 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी आपले कारखाने बंद ठेवून तसेच सर्व वाहतूक चालकांनी आपापल्या गाड्या बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते मात्र वांबोरी येथे प्रसाद शुगरनी आंदोलनामध्ये सहभागी नव्हता आपला कारखाना चालू ठेवत तसेच कारखान्याकडे वाहतूकही चालू असलेली दिसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी तुम्ही नेहमी टपलेले असतात तुमच्यामुळे शेतकरी आज भिकेला लागला आहे असे खडे बोल सुनावत प्रसाद शुगरच्या गव्हाणी मध्ये उड्या घेत कारखान्याची गव्हाण बंद पाडत आंदोलन सुरू केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी कारखान्याच्या आवारात जमले होते यावेळी पोलिसांना जिल्हाध्यक्षांसह शेतकऱ्यांना बाहेर काढणे मोठ्या आव्हान निर्माण झाली होती. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना व शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्या असून पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले. यावेळी रवींद्र मोरे यांनी म्हटले की आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण आता आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आधी आंदोलनामध्ये कारखानदारांना प्रेमाने आव्हान केले होते की सहभागी व्हावे मात्र कारखानदारांनी आवाहनाला प्रतिसाद न घेता केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आता आमच्या आंदोलन तीव्र स्वरूपाचे असणार आहे. आता कारखानदारांनी स्वाभिमानीच्या रोशाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असा इशारा रवींद्र मोरे यांनी कारखानदारांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!