ताज्या घडामोडी

मांगले येथे शिवाजीसिंग यांचा सत्कार शिराळा

Spread the love

प्रतिनिधी

कोरोनाकाळात अपंगांसाठी मोफत प्रवासी रिक्षा सुविधा पुरवण्यास सहकार्य केल्याबद्दल मांगले येथील शिवाजी सिंग यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघ यांच्या माध्यमातून कोरोणा काळात शिराळा पंचायत समितीच्या वतीने अपंगांसाठी मोफत प्रवासी रिक्षा सुरू केली होती. त्यावेळी मांगले येथील प्रहार रुग्णसेवक शिवाजी सिंग यांनी कोरोना रूग्णांना दवाखान्यात ने-आण करण्यास सहकार्य केले होते. त्याबद्दल त्यांचा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुडाळकर , करुणा मोहिते, प्रहार संघटनेचे विभाग प्रमुख ओंकार पाटील, रायसिंग पाटील, किशोर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!